VIDEO : रोहितनं फिल्ड सेट करुन किंगची केली 'शेळी'

Rohit Sharma sets the field at mid wicket  Brandon King gets out next ball
Rohit Sharma sets the field at mid wicket Brandon King gets out next ballSakal
Updated on

वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे सामन्यातून रोहित पर्वाला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकल्यानंतर रोहित शर्मानं दमदार कमबॅक केले. अर्धशतकी खेळी करून त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याशिवाय आपल्यातील नेतृत्वाची झलकही त्याने फिल्डिंगवेळी दाखवून दिली. आपल्यातील नेतृत्वाच्या कर्तृत्वानं मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पाच वेळा जेतेपद मिळवून दिलेल्या रोहित शर्माने वेस्ट इंडीज विरुद्ध फिल्ड सेट करुन ब्रँडन किंगला शेळी केल्याची झलक पाहायला मिळाली.

वनडे संघात पहिल्यांदा फुलटाईम कॅप्टन्सी करणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) वेस्ट इंडीजच्या डावातील 12 व्या षटकात बँडन किंगसाठी जाळे विणलं. वाशिंग्टन सुंदर गोलंदाजीला आल्यावर रोहित शर्माने मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला फिल्ड सेट केली. स्टंम्प माईकमध्ये फिल्ड सेट करतानाचे त्याचे शब्द कैद झाले. 12 व्या षटकात हा प्रकार सुरु असताना विराट कोहलीही त्याला सूचना देताना दिसेल. दुसऱ्याच चेंडूवर ब्रँडन किंग झेलबाद झाला. वाशिंग्टन सुंदरनं शॉर्ट लेंथ चेंडू टाकला. किंगने मिडविकेटला फटका मारला आणि तिथे सुर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) उत्तम झेल घेत किंगचा खेळ खल्लास केला.

ब्रँडन किंग मोठी फटकेबाजी करण्यात माहिर आहे. वेस्ट इंडीजच्या डावाची सुरुवात करणाऱ्या या नवख्या गड्याला रोहितनं अनुभवाच्या जोरावर तंबूत धाडले. त्याने 26 चेंडूचा सामना करत 13 धावांची भर घातली. आपल्या या छोट्याखानी खेळीत त्याने दोन खणखणीत चौकारही लगावले. पण रोहित शर्माचे चक्रव्यूव्ह भेदण्यात तो अपयशी ठरला. जेसन होल्डर वगळता एकाही कॅरेबियन खेळाडूला मैदानात तग धरता आला नाही. त्यामुळे त्यांचा डाव दोनशेच्या आत गुंडळला. भारतीय संघाने 6 विकेट्स राखून सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.