IND vs WI : विराट कोहली टीम इंडियासोबत वेस्ट इंडीजला का नाही गेला? मोठी अपडेट आली समोर

ind vs wi series team india
ind vs wi series team india
Updated on

Team India Tour Of West Indies : टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये यजमान संघाविरुद्ध दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून कसोटी सामन्याने होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजला पोहोचला आहे.

भारतीय खेळाडू तुकड्यांमध्ये विंडीजला रवाना होणार आहे. बीसीसीआयला एकाच फ्लाइटमध्ये सर्व खेळाडूंना तिकीट मिळू न शकल्याने असे करावी लागले. मात्र संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली अद्याप वेस्ट इंडिजला रवाना झालेले नाहीत.

ind vs wi series team india
West Indies WC 2023 : पाकिस्तानच्या हातात किल्ली! वेस्ट इंडिजसाठी वर्ल्ड कपचं उघडणार दरवाजे

विराट टीम इंडियासोबत वेस्ट इंडीजला का नाहीत गेले?

भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली सध्या कुटुंबासोबत सुट्टीवर गेला आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू पुढील आठवड्यात विंडीजला पोहोचण्याची शक्यता आहे. विराट कोहली लंडनमध्ये कुटुंबासोबत आहे. वृत्तानुसार तो लंडनहूनच थेट वेस्ट इंडिजला जाणार आहेत.

ind vs wi series team india
Video : क्रीडा विश्वात पसरली शोककळा! या स्टार खेळाडूचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

टीम इंडिया 1 महिन्याच्या ब्रेकनंतर खेळणार

टीम इंडिया 1 महिन्याच्या ब्रेकनंतर खेळायला सुरुवात करणार आहे. भारतीय संघ 2023-2025 ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात दोन्ही संघांमधील कसोटी मालिकेने करेल. कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून पहिले दोन सामने 27 आणि 29 जुलै रोजी बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हलवर होणार आहेत. तिसरा एकदिवसीय सामना 1 ऑगस्ट रोजी त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत खेळवला जाईल.

ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये 3 ऑगस्टपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. टी-20 मालिकेतील शेवटचे 2 सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवले जाणार आहेत.

वेस्ट इंडिज दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक

  • 12 ते 16 जुलै, पहिली कसोटी, डॉमिनिका

  • 20 ते 24 जुलै, दुसरी कसोटी, त्रिनिदाद

  • 27 जुलै, पहिली वनडे, बार्बाडोस

  • 29 जुलै, दुसरी वनडे, बार्बाडोस

  • १ ऑगस्ट, तिसरी वनडे, त्रिनिदाद

  • 3 ऑगस्ट, पहिली टी-20, त्रिनिदाद

  • 6 ऑगस्ट, दुसरी टी-20, गयाना

  • 8 ऑगस्ट, तिसरी टी-20, गयाना

  • 12 ऑगस्ट, चौथी टी-20, फ्लोरिडा

  • 13 ऑगस्ट, पाचवी टी-20, फ्लोरिडा

ind vs wi series team india
West Indies WC 2023 : वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार संतापला, पराभवाचे खापर कोणाच्या माथी फोडले

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडिया :

कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर , अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.