कोहलीचा विक्रम हुकला! टी-20 चा किंग व्हायला 1 चौका पडला कमी

Virat Kohli
Virat KohliSakal
Updated on

India vs West Indies, 2nd T20I : वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात किंग विराट कोहलीनं भारतीय संघाचा डाव सावरला. त्याने या सामन्यात अर्धशतक केले.पण तो एका खास रेकॉर्ड जवळ येऊन थांबला. वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार कायरेन पोलार्डनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. इशान किशन आणि रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतले. पण किंग कोहलीनं आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर रिषभ पंत आणि व्यंकटेश अय्यरन केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 187 धावांपर्यंत मजल मारली.

विराट कोहली (Virat Kohli) अवघ्या चार धावांनी मोठ्या विक्रमापासून दूर राहिला. वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहली मोठ्या विक्रमापासून दूर राहिला. त्याने 41 चेंडूत 52 धावांची दमदार खेळीही केली. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यातील 89 व्या डावात कोहलीनं 30 वे अर्धशतक पूर्ण केले. नाबाद 94 ही त्याची टी-20 तील सर्वोच्च खेळी आहे. 52 च्या सरासरीसह 138 च्या स्ट्राइक रेटनं त्याने 3296 धावा केल्या आहेत.

Virat Kohli
कोण आहे Sakibul Gani? ज्यानं Ranji Trophy मध्ये रचला इतिहास

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या नावे आहे. त्याने 108 डावात 33 च्या सरासरीनं 3299 धावा केल्या आहेत. जर कोहलीने एक चौकार मारला असता तर टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावे जमा झाला आहे. या शर्यतीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या खात्यात 3256 धावांची नोंद आहे.

Virat Kohli
IND vs WI : मैदानात पाय ठेवताच पोलार्डची सेंच्युरी!

दुसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहलीची ही संधी हुकली असली तरी हा विक्रम आता त्याच्या टप्प्यात आला आहे. लवकरच तो टी-20 तील किंग होईल. दुसऱ्या बाजूला त्याला रोहित शर्मा फाइट देताना दिसेल. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा करण्यात या दोघांमधील शर्यत पाहणे चांगलेच रोमहर्षक असेल. विराटला तगडी फाईट देण्यासाठी रोहितसमोर आधी मार्टिन गप्टील याला मागे टाकण्याचे आव्हान असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.