VIDEO : "उल्टा वाला डाल..." कोहली-चहलच्या प्लॅनवर पोलार्ड फसला!

Yuzvendra Chahal And Virat Kohli
Yuzvendra Chahal And Virat KohliSakal
Updated on

IND vs WI Virat Kohli Chahal Plan : वेस्ट इंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने विजय सलामी दिली. भारतीय संघाच्या विजयात युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) सर्वाधिक 4 विकेट घेत मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. त्याच्या चार विकेट्समध्ये वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज केरॉन पोलार्डच्या (Kieron Pollard) विकेटचाही समावेश होता. चहलने पोलार्डला आल्यापावली तंबूत धाडले.

वेस्ट इंडीजच्या (West Indies) डावातील 20 व्या षटकात चहलनं निकोलस पूरनला आपल्या जाळ्यात अडकले. पूरन 18 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर केरॉन पोलार्ड क्रिझमध्ये आला. भारतीय फिरकीपटूनं त्याला खातेही उघडू दिले नाही. पोलार्डला बाद करण्यापूर्वी चहलने पूरनच्या रुपात वनडेत 100 विकेट्स पूर्ण करण्याचा पराक्रम आपल्या नावे केला. सर्वात जलदगतीने हा टप्पा पार करणारा तो भारताचा दुसरा फिरकीपटू ठरलाय.

Yuzvendra Chahal And Virat Kohli
रेकॉर्ड ब्रेक 1000 वी वनडे! टीम इंडियाचा 519 वा विजय

निकोलस पूरनची जागा घेण्यासाठी केरॉन पोलार्ड क्रिजमध्ये येत असताना विराट कोहली (Virat Kohli)चहलला विकेट घेण्याचा मंत्र देत होता. "उल्टा वाला डाल... बिनधास्त डाल" असा सल्ला विराटने फिरकीपटू चहलला दिला. चहलनं वेस्ट इंडीजच्या धिप्पाड कर्णधाराला फ्लायडेट गुगली फेकली. आणि पोलार्ड त्याच्या जाळ्यात अडकला. पूरनपाठोपाठ चहलच्या खात्यात दुसरी विकेट जमा झाली.

Yuzvendra Chahal And Virat Kohli
VIDEO : रोहितनं फिल्ड सेट करुन किंगची केली 'शेळी'

कॅप्टन नसला तरी कोहलीनं घेतलेला पुढाकार...

पोलार्ड बाद झाल्यानंतर कोहलीचा आनंद गगनात मावेना, असा क्षण पाहायला मिळाला. या विकेटमागे आपली टिप्स कामी अल्याचा आनंदच जणू तो व्यक्त करत होता. भारतीय संघाच्या तिन्ही क्रिकेट प्रकारातील कॅप्टन्सी सोडल्यानंतर विराट कोहली पुढे येऊन नव्या कर्णधाराला सूचना करताना दिसले. रिव्ह्यू घेण्याचा सल्लाही तो नवा कर्णधार रोहितला देताना दिसले. रोहितनं कोहलीच ऐकल आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर चहलच्या खात्यात ब्रुक्सच्या रुपात एक विकेटही जमा झाल्याचे पाहायला मिळाले. कॅप्टन नसतानाही त्याने पुढाकार घेत संघासाठी फायदेशीर भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.