IND vs ZIM : भारताविरुद्धच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा

भारताविरुद्धच्या आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाची घोषणा
Zimbabwe Cricket announces squad for ODI series vs India
Zimbabwe Cricket announces squad for ODI series vs Indiasakal
Updated on

हरारे : भारताविरुद्धच्या आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. ३४ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज रेगीस चकाब्वा याच्याकडे झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. चकाब्वाने याआधी २००८ मध्ये पहिल्यांदाच झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले होते.

नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याच्याकडे पहिल्यांदाच नेतृत्व सोपवण्यात आले होते. या मालिकेत झिम्बाब्वेने बांगलादेशवर २-१ अशा फरकाने विजय साकारला.(Zimbabwe Cricket announces squad for ODI series vs India)

Zimbabwe Cricket announces squad for ODI series vs India
MS Dhoni ने स्वातंत्र्य दिनाच्या आधी बदला इन्स्टाग्राम DP; 'भाग्य है मेरा, मैं एक भारतीय हूं'

भारत-झिम्बाब्वे यांच्यामध्ये तीन एकदिवसीय लढती १८, २० व २२ ऑगस्ट या कालावधीत खेळवण्यात येणार आहेत.

या तिन्ही लढती हरारे येथे पार पडणार आहेत. झिम्बाब्वेच्या संघाला दुखापतग्रस्त खेळाडूंचा फटका यावेळी बसला आहे. क्रेग इरविन हा त्यांचा कर्णधार आहे, पण दुखापतीमुळे तो या मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी चकाब्वा याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. वेलिंग्टन मासाकादझा, ब्लेसींग मुझराबानी, तेदांई चतारा हे प्रमुख खेळाडूही दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाहीत.

Zimbabwe Cricket announces squad for ODI series vs India
Cheteshwar Pujara: लंडनमध्ये चेतेश्वर पुजाराचे तुफान, एका षटकात ठोकले 22 धावा - VIDEO

दोन देशांमधील ही मालिका एकदिवसीय जागतिक स्पर्धा सुपर लीग या अंतर्गत खेळवण्यात येणार आहे. भारतानेही संघ जाहीर केलेला असून केएल राहुल नेतृत्व करणार आहे. १६ ऑगस्ट रोजी भारतीय संघ हरारेसाठी रवाना होईल.

झिम्बाब्वेचा संघ ः रायन बुर्ल, रेगीस चकाब्वा (कर्णधार), तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट किया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()