IND W vs Aus W ODI : ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी! भारतीय संघावर ६ विकेट राखून मात

पहिल्या टी-२० सामन्यात पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात ६ विकेट राखून भारतीय महिला संघावर विजय मिळवला आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
IND W vs Aus W ODI
IND W vs Aus W ODIEsakal
Updated on

पहिल्या टी-२० सामन्यात पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात ६ विकेट राखून भारतीय महिला संघावर विजय मिळवला आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियन संघासमोर १३१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. एलिसा हिली व बेथ मुनी या सलामी जोडीने ५१ धावांची भागीदारी करताना आश्वासक सुरुवात केली. दीप्ती शमनि हिलीला २६ धावांवर, तर मुनीला २० धावांवर बाद करीत भारताचे पुनरागमन केले. त्यानंतर तहलिया मॅग्रा १९ धावांवर, तर अॅश्ले गार्डनर ७ धावांवर बाद झाली. पण एलिस पेरीने नाबाद ३४ धावांची आणि फोबे लिचफिल्डने नाबाद १८ धावांची खेळी करीत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

IND W vs Aus W ODI
T20 World Cup: BCCI ने दिला इशारा...! रोहित शर्मा अन् विराट कोहली T20 वर्ल्ड कप खेळणार?

दरम्यान, स्मृती मानधना व शेफाली वर्मा या सलामी जोडीने पहिल्या लढतीत १३७ धावांची भागीदारी करताना भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. पण या लढतीत दोघीही अपयशी ठरल्या. किम गार्थने शेफालीला १ धावेवर बाद केले. त्यानंतर गार्थ हिनेच जेमिमा रॉड्रिग्ज हिला १३ धावांवर एलिसा हिलीकरवी झेलबाद केले.

IND W vs Aus W ODI
Ind vs Afg T20 Team India Squad : टीम इंडियाची घोषणा! रोहित शर्मा झाला कर्णधार, विराटचेही पुनरागमन; जाणून घ्या संपूर्ण संघ

मानधना व कर्णधार हरमनप्रीत कौर ही अनुभवी जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच अॅनाबेल सदरलँड हिने मानधना हिला २३ धावांवर बाद करीत मोठा धक्का दिला. अॅश्ले गार्डनर हिने हरमनप्रीतला ६ धावांवर बाद करीत भारताची अवस्था ४ बाद ५४ धावा अशी केली. रिचा घोष व दीप्ती शर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रिचाने २३ धावांची व दीप्तीने ३० धावांची खेळी केली. जॉर्जिया वेअरहॅमने रिचाला बाद केले, तर दीप्ती धावचीत झाली.

संक्षिप्त धावफलक भारत २० षटकांत ८ बाद १३० धावा (रिचा घोष २३, दीप्ती शर्मा ३०, जॉर्जिया वेअरहेंम २/१७, अॅनाबेल सदरलँड २/१८) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया १९ षटकांत ४ बाद १३३ धावा (एलिस पेरी नाबाद ३४, एलिसा हिली २६).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.