IND vs BAN 3rd ODI: निर्णायक सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून घेतला हा निर्णय! टीम इंडियाच्या Playing-11 मोठा बदल

banw vs indw 2nd odi
banw vs indw 2nd odi
Updated on

IND-W vs BAN-W 3rd Odi : गेल्या तीन सामन्यातील अपयश धुऊन काढून भारतीय महिलांनी बांगलादेशविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली; पण सर्व प्रश्न सुटलेले नाहीत. आज होणाऱ्या अखेरच्या सामन्यात सुरुवातीच्या फलंदाजांना जबाबदारी स्वीकारून धावा कराव्या लागणार आहेत.

भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ढाका येथे खेळला जात आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून विजयी संघ मालिका जिंकेल. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बांगलादेश संघ दोन बदलांसह मैदानात उतरला आहे. त्याचबरोबर भारतीय संघात प्रिया पुनियाच्या जागी शेफाली वर्माला संधी देण्यात आली आहे.

banw vs indw 2nd odi
Team India: बुमराह, अय्यर, राहुल परतणार! पण टीम इंडियाच्या 'या' खेळाडूचं काय? 6 महिने झाले बाहेर

बुधवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने १०८ धावांनी मोठा विजय मिळवला आणि आपली क्षमता दाखवली; पण मालिका गमावण्याचे संकट अजून दूर झालेले नाही. बांगलादेशकडून भारतीय महिलांनी अजूनपर्यंत एकदिवसीय मालिका गमावलेली नाहीच; पण याच बांगलादेशमध्ये पुढील वर्षी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे, त्यासाठी आत्ता मालिका विजयाचा आत्मविश्वास प्रेरणादायी ठरू शकेल.

banw vs indw 2nd odi
WC IND-PAK : अहमदाबादमधील भारत-पाक सामन्यासाठी काय वाट्टेल ते...

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघ अवघ्या ११३ धावांत गारद झाला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र चांगली सुधारणा करत सव्वादोनशे धावा केल्या होत्या. यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचे मोठे योगदान राहिले होते.

उपकर्णधार आणि अत्यंत भरवशाची स्मृती मानधना टी-२० मालिकेपासून झगडत आहे. दोन एकदिवसीय सामन्यात मिळून तिला केवळ ४७ धावाच करता आल्या आहेत. तिच्या लौकिकापेक्षा ही कामगिरी फारच कमकुवत आहे.

  • भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (क), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, देविका वैद्य, मेघना सिंग.

  • बांगलादेश: शमीमा सुलताना, शोभना मोस्टोरी, फरगाना हक, लता मंडल, रितू मोनी, निगार सुलताना (wk/c), राबेया खान, नाहिदा अख्तर, फहिमा खातून, सुलताना खातून, मारुफा अख्तर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.