IND W vs PAK W : पाक विरुद्ध मिताली ब्रिगेडनं आखलाय खास प्लॅन

Indian cricketer Mithali Raj
Indian cricketer Mithali Raj
Updated on

माउंट मोनगानुई : ICC Womens World Cup 2022, India Womens vs Pakistan Women: आयसीसी महिला वर्ल्ड कप 2022 स्पर्धेतील सलामीच्या लढतीत भारतीय महिला संघ पारंपारिक प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या पाकिस्तान संघाविरुद्ध भिडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाची कर्णधार मिताली राजनं ऑनलाईनच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाकिस्तानचा संघ चांगला आहे. त्यांना आम्ही हलक्यात घेणार नाही, असे मिताली राजनं म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या संघाने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी चांगली मेहनत घेतली असेल. त्यांच्यामध्ये डावाला कलाटणी देण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही, असे सांगत मितालीनं पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याचे संकेत दिले. स्पर्धेतील प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असेल, असेही त्याने तिने सांगितले.

Indian cricketer Mithali Raj
Shane Warne Greatness : बेधडक, बेजोड.... आणि बेमालूमही...!

भारतीय संघाची अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामी हिच्यासंदर्भात मिताली म्हणाली की, आम्ही दोघी बऱ्याच काळापासून भारतीय ड्रेसिंग रुम शेअर करत आहोत. देशाचे प्रतिनिधीत्व करणं अभिमानाची गोष्ट आहे. झुलन गोस्वामीचा संघातील सहभाग हा आमच्यासाठी जमेची बाजू आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून ती संघाचा भाग आहे. तिच्या हाती चेंडू दिल्यानंतर ती आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडते. तिच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल.

Indian cricketer Mithali Raj
... तर सर जडेजा डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तीत बसला असता

मिताली राजने ऑल राउंडर हरमनप्रीत कौर हिच्यासंदर्भातील भाष्य केले. मध्य फळीत भारतीय संघाचा डाव सांभाळण्यासाठी ती सक्षम आहे. ती भारतीय संघातील प्रमुख सदस्यांपैकी एक आहे, असा उल्लेखही मितालीनं केला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी तिने केलेल्या शतक हे तिच्यासह संघासाठी चांगले संकेत आहेत, असेही मितालीने यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.