IND vs AUS : रेकॉर्ड्सचा पाऊस! विराट 40 महिन्यांनंतर ठरला सामनावीर, तर अश्विनने...

ind won border gavaskar trophy for 4th consecutive time check all breken records virat kohli r ashwin jadeja records
ind won border gavaskar trophy for 4th consecutive time check all breken records virat kohli r ashwin jadeja records
Updated on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे खेळवण्यात आलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासह भारताने पुन्हा एकदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2-1 ने जिंकली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निकाल गेल्या 6 वर्षांपासून बदललेला नाहीये. भारताने शेवटच्या 4 ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

2017, 2019, 2021 आणि आता 2023 मध्ये भारताने ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने नागपूर आणि दिल्ली कसोटीत एकतर्फी विजय मिळवला होता, मात्र इंदूरमध्ये विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने आपले खाते उघडले.

अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण ते होऊ शकले नाही. अहमदाबादमध्ये प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 480 धावा केल्या. यानंतर भारताने पहिल्या डावात 571 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 5व्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 बाद 175 धावा केल्या होत्या. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकताच भारतीय संघाने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

  • घरच्या मैदानावर भारताची धडाकेबाज खेळ सुरूच आहे. टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 16वी कसोटी मालिका जिंकली आहे.

  • आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना संयुक्तपणे प्लेअर ऑफ द सीरीज राहिले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 10 प्लेयर ऑफ द सिरीज जिंकणारा अश्विन हा दुसरा खेळाडू आहे. मुथय्या मुरलीधरन 11 पुरस्कारांसह अव्वल स्थानावर आहे.

  • उस्मान ख्वाजाने या मालिकेत सर्वाधिक 333 धावा केल्या. तर विराट कोहली 297 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ind won border gavaskar trophy for 4th consecutive time check all breken records virat kohli r ashwin jadeja records
IND vs AUS: टीम इंडियाने घातली बॉर्डर गावसकर ट्रॉफीला गवसणी! ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा टेकले गुडघे
  • चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहली सामनावीर ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये 40 महिन्यांनंतर त्याने हा पुरस्कार जिंकला. त्याने कसोटीत दहाव्यांदा हा पुरस्कार जिंकला. कोहलीने 186 धावांची इनिंग खेळली होती. कोहलीला 10 ऑक्टोबर 2019 रोजी कसोटीत अखेरचा सामनावीर किताब पटकावता आला होता. पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने नाबाद 254 धावांची खेळी केली होती.

  • भारताने घरच्या मैदानावर सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली. यापूर्वी 2017, 2019 आणि 2021 मध्ये भारताने विजेतेपद पटकावले होते.

  • चौथ्या कसोटीत कोहलीची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली . सलग 41 डावांनंतर त्याच्या बॅटमधून शतक झळकले.

ind won border gavaskar trophy for 4th consecutive time check all breken records virat kohli r ashwin jadeja records
Bhushan Desai News : भूषण देसाईंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश का केला? स्पष्टच सांगितलं कारण…

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()