India at Paris Paralympic 2024 Archery: भारतीय संघासाठी पॅरालिम्पिक स्पर्धेतील सोमवारचा दिवस पदकांचा पाऊस पाडणारा ठरला. नितेश कुमारच्या सुवर्णपदकानंतर सुहास व थुलासिमाथी यांनी रौप्यपदक जिंकले, तर मनीषाने कांस्यकमाई केली. यानंतर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या तिरंदाजीवर.. शीतल देवी आणि राकेश कुमार या जोडीने वर्ल्ड रेकॉर्ड कामगिरी करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पण, इराणच्या जोडीला कडवी टक्कर देऊनही भारतीय खेळाडूंना पराभूत घोषित केले गेले. १५२-१५२ अशा बरोबरीनंतर झालेल्या शूट ऑफमध्ये इराणला विजयी ठरवले गेले, परंतु हा निर्णय घेताना चिटींग झाल्याचा आरोप होताना दिसतोय...
शीतल देवी आणि राकेश कुमार या भारतीय तिरंदाजांनी Mixed Team Compound खुल्या गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियावर १५४-१४३ असा विजय मिळवून आगेकूच केली. पण, उपांत्य फेरीच्या लढतीत चुरशीची टक्कर देऊनही त्यांना इराणी जोडीकडून १५२-१५२ अशा बरोबरीनंतरही हार मानावी लागली. त्यामुळे दोन्ही देशांतील खेळाडूंना प्रत्येकी १-१ संधी दिली गेली आणि त्यात इराणने बाजी मारली. इराण आणि भारत या दोघांचा प्रयत्न ९ गुणाच्या वर्तुळात होता. पण, इराणचा तीर हा १० गुणाच्या वर्तुळाजवळ असल्याने त्यांना विजयी घोषित केले गेले. त्या तुलनेत भारताचा तीर हा थोडा दूर राहिला. पण, इराणला १० गुण दिल्याने चिटींगचा आरोप होत आहे.
कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय जोडीने इटलीच्या तिरंदाजांना हरवले. दोन फेरीनंतर ७८-७८ अशा बरोबरीमुळे चुरस पाहायला मिळेल असे वाटले होते. पण, तिसऱ्या फेरीत इटालियन जोडीने १ गुणाच्या फरकाने आघाडी घेतली अन् धाकधुक वाढली. पण, चौथ्या फेरीत भारतीय जोडीने १५६-१५५ अशी बाजी मारली आणि कांस्यपदक नावावर केले. तिरंदाजीतील हे भारताचे पहिलेच पदक ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.