India at Paralympics 2024 Live: भारताला मोठा धक्का; Manasi Joshi पहिल्याच सामन्यात पराभूत

India at Paralympics 2024 Badminton : भारताला पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाचा सामना करावा लागला.
India at Paralympics 2024 Badminton
India at Paralympics 2024 Badminton esakal
Updated on

India at Paralympics 2024 Badminton : भारताच्या नितेश कुमार आणि तुलसीमाथी मुरुगेसन यांना गुरुवारी येथे पॅरालिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन मिश्र दुहेरीच्या (SL3-SU5) पहिल्या गटात विजय मिळवला. त्यांनी या सामन्यात सहकारी सुहास यथीराज आणि पलक कोहली यांच्यावर ३१ मिनिटांत २१-१४ व २१-१७ असा विजय मिळवला. तेच मानसी जोशीने महिला एकेरी SL3 गटाच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील २९ वर्षीय नितेश आणि तामिळनाडूतील तुलसीमाथी या जोडीने हांगझू येथील आशियाई पॅरा गेम्समध्ये मिश्र गटात कांस्यपदक जिंकले होते. शिवराजन व नित्या या भारतीय जोडीला SH6 गटात अमेरिकेच्या माईल्स व सिमॉन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २०१९ मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मानसीला पॅरालिम्पिक स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. इंडोनेशियाच्या क्वानिताह सियाकुरोहने तिचा तीन गेममध्ये २-१ असा पराभव केला. मानसीने पहिला गेम २१-१६ असा जिंकला. पण, इंडोनेशियाच्या खेळाडूने जबरदस्त पुनरागमन केले आणि पुढील दोन गेम २१-१३, २१-१८ असे जिंकून भारतीय खेळाडूचे आव्हान संपुष्टात आणले. भारतासाठी हा खूप मोठा धक्का आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.