India at Paralympics 2024 Badminton : पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताला मानसी जोशीच्या पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला. नवी मुंबईच्या मानसीने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु इंडोनेशियन खेळाडू वरचढ ठरली. पण, त्यानंतर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या सुकांत कदमने ( Sukant Kadam ) थरारक विजयाची नोंद करून देशाची मान उंचावली.
भारताच्या नितेश कुमार आणि तुलसीमाथी मुरुगेसन यांना गुरुवारी येथे पॅरालिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन मिश्र दुहेरीच्या (SL3-SU5) पहिल्या गटात विजय मिळवला. त्यांनी या सामन्यात सहकारी सुहास यथीराज आणि पलक कोहली यांच्यावर ३१ मिनिटांत २१-१४ व २१-१७ असा विजय मिळवला.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २०१९ मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मानसीला पॅरालिम्पिक स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. इंडोनेशियाच्या क्वानिताह सियाकुरोहने तिचा तीन गेममध्ये २-१ असा पराभव केला. मानसीने पहिला गेम २१-१६ असा जिंकला. पण, इंडोनेशियाच्या खेळाडूने जबरदस्त पुनरागमन केले आणि पुढील दोन गेम २१-१३, २१-१८ असे जिंकले.
सांगलीच्या सुकांत कदमला Men's Singles SL4 Group Play Stage च्या पहिल्याच सामन्यात कडवी झुंज द्यावी लागली. मलेशियाच्या बुर्हानुद्दीन मोहम्मद याने पहिला गेम २१-१७ असा जिंकून भारतीय खेळाडूवर दडपण निर्माण केले होते. पण, सुकांतने जबरदस्त पुनरागमन केले आणि दुसरा गेम २१-१५ असा जिंकून सामना १-१ असा बरोबरीत आणला. तिसऱ्या गेममध्ये कमालीची रोमहर्षकता पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडू एकमेकांना कडवी टक्कर देत होते, परंतु सुकांतने २२-२० अशी बाजी मारली.
वयाच्या १० व्या वर्षी सुकांत कदमला क्रिकेटच्या मैदानावर अपघात झाला आणि त्याचे आयुष्य बदलले. गुडघ्याची गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. तो दिव्यांग झाला आणि जवळपास एक दशक तो खेळापासून दूर राहिला. त्याने मेकॅनिकल इंजिनिअर पूर्ण केले आणि २०१२ मध्ये सायना नेहवालने ऑलिम्पिक पदक जिंकल्याचे पाहून तो प्रेरित झाला आणि पॅरा बॅडमिंटनपटू बनला.
जुलै २०१५ मध्ये, कदम निखिल कानेटकर बॅडमिंटन अकादमीमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून रुजू झाला. या भूमिकेमुळे त्याला खेळातील बारकावे पार पाडताना आर्थिकदृष्ट्या टिकून राहता आले. कदम यांच्या समर्पणाचे चीज झाले. त्यानंतर त्याने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये (२०१९, २०२२, २०२४ ) चार आणि आशियाई पॅरा गेम्स ( २०१८ व २०२२) मध्ये तीन कांस्यपदके मिळवली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.