Paralympic 2024: गोल्ड हुकले, पण Sharad Kumar अन् मरियप्पन थंगवेलू यांनी भारतासाठी रौप्य व कांस्यपदक जिंकले

Paris Paralympic 2024 Live : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील सहाव्या दिवसातील पहिले पदक भारताला दीप्ती जीवनजीने जिंकून दिले. त्यानंतर उंड उडीत दोन पदकं आली.
Mariyappan Thangavelu
Mariyappan Thangaveluesakal
Updated on

Paris Paralympic 2024 Live : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील सहाव्या दिवसातील पहिले पदक भारताला दीप्ती जीवनजीने जिंकून दिले. पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकाराता भारताच्या शरद कुमार ( Sharad Kumar) आणि अमेरिकेच्या इझ्रा फ्रेच यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली. १.९१ मीटरनंतर १.९४ मीटर उंच उडीचे लक्ष्य दोघांसमोर ठेवले गेले. पण, फ्रेचने यशस्वी उडी मारून सुवर्णपदक नावावर केले. शरदला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. Mariyappan Thangaveluला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. १.८८ मीटर उंच उडी मारण्यात तो अपयशी ठरला, परंतु पॅरालिम्पिक स्पर्धेत तीन सुवर्ण, रौप्य व कांस्य अशी तिन्ही पदकं मरियप्पनच्या नावावर आहेत.

रिओमध्ये सुवर्ण, टोकियोत रौप्यपदक जिंकणाऱ्या मरियप्पन थंगवेलूने पॅरिसमध्येही कमाल केली. पुरुषांच्या उंच उडीच्या T63 Final मध्ये त्याने शरद कुमार व शैलेश कुमार यांच्यासह सहभाग घेतला होता. मरियप्पनने टोकियोत १.८६ मीटर उंच उडी मारून पॅरालिम्पिक विक्रमाची नोंद केली होती. भारताच्या शरद कुमारने १.९० मीटर ही सर्वोत्तम कामगिरी केली होती आणि त्यामुळे त्याच्याकडूनही पदकाच्या आशा होत्या. शरदने २०१४च्या आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. शैलेश कुमारनेही २०२२च्या आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्ण जिंकले आहे.

Mariyappan Thangavelu:
Mariyappan Thangaveluesakal

शैलेशने १.७२ मीटर उंच उडी मारली आणि डॉमिनिक व कॅमेरूनच्या खेळाडूंना टक्कर दिली. शरदने १.७७ मीटरचे आव्हान स्वतःसमोर ठेवले होते आणि त्याने ते पार करून अव्वल स्थानी झेप घेतली. पण, कॅमेरूनच्या याव्हेसने १.७७ मीटर उंच उडी मारून उलटफेर नोंदवला. मरिय्यपननेही १.७७ मीटर उंच उडी मारली. शैलेशही या पंक्तित आला. पण, तीन प्रयत्नानंतर भारताचे तिन्ही खेळाडू अव्वल ३ क्रमांकाच्या शर्यतीत नव्हते. शरदने चौथ्या प्रयत्नात १.८१ मीटर उंच उडी मारून सुवर्णपदकाच्या शर्यतीत झेप घेतली. कॅमेरूनच्या खेळाडूला अपयश आल्याने तो शर्यतीतून बाहेर फेकला गेला.

मरियप्पनेही यशस्वी उंच उडी घेत तिसऱ्या क्रमांकावर आगेकूच केली. शैलेशनेही सत्रातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. चौथ्या फेरीअखेरीस अमेरिकेचा एझ्रा फ्रेच अव्वल क्रमांकावर होता, तर भारताचे तीनही खेळाडू त्यानंतर रांगेत होते. शरदचा १.८६ मीटर उंड उडीचा प्रयत्न चुकला. फ्रेचलाही अपयश आल्याने शैलेश व मरियप्पन यांना संधी मिळाली आणि मरियप्पन यशस्वी ठरला. वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर फ्रेंच १.८५ मीटर उंच उडी मारून पुन्हा पदक शर्यतीत आला. आता १.८८ मीटरचे लक्ष्य सर्वांसमोर होते.

फ्रेचने यशस्वी उडी मारून पुन्हा अव्वल स्थान काबीज केले. तेच शरद व मरियप्पनला पहिल्या प्रयत्नात अपयश आले. शरदने दुसऱ्या प्रयत्नात १.८८ मीटर उंच उडी मारून पॅरालिम्पिक विक्रम नावावर केला. मरियप्पनचे तिन्ही प्रयत्न अपयशी ठरले आणि त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. फ्रेच व शदर यांच्यात सुवर्णपदकासाठी चुरस रंगली. फ्रेचने पहिल्याच प्रयत्नात १.९१ मीटर उंच उडी मारली आणि शरदला दुसऱ्या प्रयत्नात यश आल्याने. १.९४ मीटर उंच बार उचलला गेला आणि फ्रेचने तेही उंतर सहज पार केले.

भारताचा मरिय्यपन थंगवेलू...

तामिळनाडूमधील सालेम येथे त्याचा जन्म झालेल्या मरियप्पनला ९ वर्षांचा असताना दिव्यांगत्व आलं. लहान असतानाच वडिलांनी त्याला आणि त्याच्या भावंडांना सोडलं. त्यामुळे मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आईवर पडली. त्याच्या आईनेही वीट भट्टीवर काम केलं आणि मग भाजी विकण्यास सुरुवात केली. मरिय्यम ९ वर्षांचा असताना शाळेत जाताना त्याचा अपघात झाला. त्याच्या पायावरून बस गेली. परिणामी त्याला त्याचा पाय गमवावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.