India Austrolia One Day : भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ सज्ज; कमिन्स, स्मिथ, स्टार्क, मॅक्सवेलचे पुनरागमन

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून संघाची घोषणा रविवारी करण्यात आली.
pat cummins mitchell starc
pat cummins mitchell starcsakal
Updated on

नवी दिल्ली - भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून संघाची घोषणा रविवारी करण्यात आली. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्टीव स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल या चार खेळाडूंचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले आहे.

ॲशेस मालिकेतील अखेरच्या कसोटीपासून पॅट कमिन्स संघाबाहेर होता. त्याच्या मनगटाला दुखापत झाली होती. मिचेल स्टार्कचा मांडीचा सांधा दुखावला गेला. तो या दुखापतीमधून बरा होत आहे. स्टीव स्मिथ मनगटाच्या दुखापतीसह ॲशेस मालिकेत सहभागी झाला.

तसेच पायाचा घोटा दुखावल्यामुळे ग्लेन मॅक्सवेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. त्याचेही ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले आहे. मॅथ्यू शॉर्ट या फलंदाजाची निवड करण्यात आली असून ट्रॅव्हिस हेडला दुखापतीमुळे निवडण्यात आलेले नाही. त्याच्या विश्‍वकरंडकासाठीच्या ऑस्ट्रेलियन संघातील समावेशावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होत आहे. दोन देशांमध्ये २२, २४ व २७ सप्टेंबर रोजी लढती रंगणार आहेत. या लढती अनुक्रमे मोहाली, इंदूर व राजकोट येथे पार पडणार आहेत. तिन्ही लढती दुपारी १.३० वाजल्यापासून सुरू होतील. भारतात ५ ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणाऱ्या एकदिवसीय विश्‍वकरंडकाआधी या मालिकेकडे सराव लढती म्हणून बघितले जात आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), सीन ॲबट, ॲलेक्स कॅरी, नॅथन इलिस, कॅमेरुन ग्रीन, जोश हॅझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा.

भारत - ऑस्ट्रेलिया

वन डे मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना - २२ सप्टेंबर, मोहाली

दुसरा सामना -२४ सप्टेंबर, इंदूर

तिसरा सामना - २७ सप्टेंबर, राजकोट

(तिन्ही लढती दुपारी १.३० वाजता सुरू होतील.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.