ICC T20 Team Rankings : वेस्ट इंडीज (West Indies) संघाला घरच्या मैदानात 3-0 अशी क्लीन स्वीप देत टीम इंडियाने (Team India) नुसती मालिका जिंकलेली नाही. या विजयासह टी-20 क्रिकेटमध्ये नंबर वनचा ताज देखील मिळवलाय. आयसीसीने (ICC) सोमवारी टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारी जारी केली. कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानातील दिमाखदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने क्रमवारीत अव्वलस्थान मिळवले आहे. इंग्लंडला मागे टाकत ते पहिल्या स्थानावर विराजमान झाले.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड दोन्ही संघ 269 रेटिंगसह बरोबरीत आहेत. पण भारतीय संघाच्या खात्यात 10,484 गुण जमा आहेत. याउलट इंग्लंड (10474) 10 गुणांनी मागे पडले. आयसीसीच्या क्रमवारीत पाकिस्तान (रेटिंग 266), न्यूझीलंड (255) आणि दक्षिण आफ्रिका (253) अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंकेला 4-1 अशी मात देणारा वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.
सहा वर्षानंतर मिळाला ताज
मागील सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर टीम इंडिया टी-20 क्रमवारीत अव्वलस्थानी पोहचला आहे. याआधी धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अव्वलस्थान पटकावले होते. 12 फेब्रुवारी 2016 ते 3 मे 2016 या तीन महिन्यांच्या कालावधीत टीम इंडिया अव्वलस्थानी राहिली होती. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हे स्थान किती काळ कायम ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
रोहितची विराट विक्रमाशी बरोबरी
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय टी-20 संघात नेतृत्व बदल झाला. विराट कोहलीने वर्ल्ड कप आधीच संघाची धूरा सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याने कॅप्टन्सी सोडल्यानंतर ही जबाबदाही रोहित शर्माच्या खांद्यावर आली. रोहित शर्माने न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनं पूर्णवेळ कर्णधारपदाचा भार सांभाळला. रोहित शर्माने टी-20 मध्ये संघाचे नेतृत्व करताना सलग नववा विजय मिळवला. या कामगिरीसह त्याने विराटच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.