WTC Point Table : भारताच्या मोठ्या विजयानंतर WTC पॉईंट टेबलची काय आहे परिस्थिती?

WTC Point Table IND vs AUS 1st Test
WTC Point Table IND vs AUS 1st Testesakal
Updated on

WTC Point Table IND vs AUS 1st Test : भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटीत 1 डाव आणि 132 धावांनी पराभव केल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याच्या दृष्टीने भारताने अजून एक पाऊल पुढे टाकले. भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 177 धावात रोखले. त्यानंतर भारताने पहिल्या डावात 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला साधी शंभरी गाठता आली नाही. त्यांचा संघ 91 धावात गारद झाला.

भारताकडून पहिल्या डावात रविंद्र जडेजाने 5 तर अश्विनने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या. फलंदाजीच कर्णधार रोहित शर्माने 120 धावांची शतकी खेळी केली. तर अक्षर पटेलने 84 आणि रविंद्र जडेजाने 70 धावा ठोकल्या. भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव राखून पराभव केल्यानंतर WTC Point Table ची काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊया.

WTC Point Table IND vs AUS 1st Test
Ajinkya Rahane : रहाणेला परत बोलवा... विराटवर भडकलेल्या चाहत्यांची जोरदार मागणी

WTC Point Table मध्ये काय काय झालं?

  • पहिल्या कसोटीपूर्वी WTC पॉईंट टेबलमध्ये भारताचे विनिंग पर्सेंटेज हे 58.93 इतके होते. भारत रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर होता.

  • ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर आता भारताचे विनिंग पर्सेंटेज हे 61.67 झाले आहे.

  • बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 च्या पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया WTC final च्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर होती.

  • भारताविरूद्धचा पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे विनिंग पर्सेंटेज हे 75.56 वरून घसरून 70.83 इतके झाले होते.

  • कांगारूंचे विनिंग पर्सेंटेज घसरले असले तरी ऑस्ट्रेलियाचे अव्वल स्थान अजून अबाधित आहे.

WTC Point Table IND vs AUS 1st Test
Rohit Sharma : अश्विन - जडेजानं भंडावून सोडलं; रोहित म्हणाला यांना आपली रेकॉर्ड्स...

मागील WTC सायकलमधील उपविजेते असलेल्या भारताला त्यांचे स्थान निश्चित करण्यासाठी बॉर्डर - गावसकर मालिकेतील उर्वरित तीनपैकी किमान दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. दुसरीकडे श्रीलंकेचे विनिंग पर्सेंटेज 53.33 इतके असून, श्रीलंका दोन सामन्यांच्या कसोटी मालिका न्यूझीलंड सोबत खेळणार आहे.

यादरम्यान, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात देखील दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 48.72 आहे. इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे सर्व संघ WTC अंतिम शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.