Mary Kom Retirement News : भारताची प्रतिभावान बॉक्सर मेरी कोमने निवृत्ती घेतल्याचं वृत्त बुधवारी रात्रीपासून सगळीकडे पहायला मिळत आहे. मात्र, आपण निवृत्ती घेतली नसल्याचं मेरी कोमने आता स्पष्ट केलं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेला तिने सांगितलं, की आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला असून, आपण निवृत्त होत नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.
इंटरनॅशनल बॉक्सिंग अशोसियशन (IBA) च्या नियामांनुसार पुरुष आणि महिला बॉक्सर्सना फक्त वयाच्या चाळीसीपर्यंतच बॉक्सिंग करण्याची परवानगी असते. वयोमर्यादेमुळे मेरीने निवृत्ती जाहीर केली असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान खुद्द मेरीनेच याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
दरम्यान एका कार्यक्रमादरम्यान 41 वर्षीय मेरीने तिच्यात खेळण्याची भूक अजूनही कायम आहे, परंतु वयोमर्यादेमुळे तिला आपल्या कारकिर्द थांबवावी लागणार असल्याचे कबुल केले होते.
मेरी कोमने निवृत्तीबद्दल बोलताना सांगितले होते की, माझ्यात अजूनही खेळण्यची भूक आहे परंतु दुर्दैवाने वयोमर्यादेमुळे मी कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. मला अजून खेळायचे आहे पण मला (वयोमर्यादेमुळे) बाहेर जाण्यास भाग पाडले जात आहे. मला निवृत्त व्हावे लागेल आणि मी ते करणार आहे. मेरीने आयुष्यात सर्व काही साध्य केल्याचे देखील तिने बोलून दाखवले होते.
बॉक्सिंगच्या इतिहासात सहा विश्वविजेतेपद पटकावणारी मेरी ही पहिली महिला बॉक्सर आहे. पाच वेळा आशियाई चॅम्पियन बनलेली मेरी 2024 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर होती.
मेरी कॉमचं करिअर
मेरीने लंडन 2012 ऑलिंपिक खेळांमध्ये कांस्यपदक जिंकले होते. यासह अनेक विक्रम मेरीने आपल्या नावावर केले आहेत. मेरी ही एआयबीए महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली. तिने 2005, 2006, 2008 आणि 2010 च्या मोसमात वर्ल्ड चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले होते. 2008 चे विजेतेपद जिंकल्यानंतर मेरी ने आपल्या जुळ्या मुलांना जन्म दिला, त्यावेळी ती ब्रेकवर गेली होती.
2012 ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर मेरीने तिसऱ्या मुलाला जन्म दिला, तेव्हाही ती सुट्टीवर गेली होते. मात्र लवकरच तिने पुन्हा पुनरागमन केले आणि 2018 मध्ये दिल्ली येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने आपले अव्वल स्थान पुन्हा काबीज केले. तिने युक्रेनच्या हॅना ओखोटावर 5-0 असा विजय मिळवत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. एका वर्षानंतर तिने आठवे जागतिक पदक देखील जिंकले, हे आजवर कोणत्याही पुरुष किंवा महिला बॉक्सरला शक्य झाले नाहीये.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.