FIH Award : हरमनप्रीत सिंग, पी आर श्रीजेश यांना सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन; तुम्ही ही देऊ शकता मत

PR Sreejesh - Harmanpreet Singh: आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने २०२४ वर्षासाठी हॉकी स्टार पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर केली आहेत. यामध्ये भारताच्या हरमनप्रीत सिंग आणि पीआर श्रीजेशलाही नामांकन मिळाले आहे.
PR Sreejesh & Harmanpreet Singh
PR Sreejesh & Harmanpreet SinghSakal
Updated on

FIH Hockey Stars Awards: आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने २०२४ वर्षासाठी हॉकी स्टार पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर केली आहेत. तीन विभागातील पुरस्कारांमध्ये मिळून भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि माजी गोलकिपर पीआर श्रीजेस यांना नामांकने मिळाली आहेत.

हरमनप्रीतला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे, तर पीआर श्रीजेशला वर्षातील सर्वोत्तम गोलकिपर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. महिलांच्या विभागात मात्र एकाही भारतीय खेळाडूला नामांकन मिळालेले नाही.

सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार जिंकण्यासाठी हरमनप्रीतबरोबर नेदरलँड्सचे थिरी ब्रिंकमन व जोप दे मोल, इंग्लंडचा झॅश वेलास आणि जर्मनीचा हॉनस म्युलर हे शर्यतीत आहेत.

तसेच सर्वोत्तम पुरुष गोलकिपर पुरस्कार जिंकण्यासाठी पीआर श्रीजेशसह स्पेनचा लुईस काल्झाडो, अर्जेंटिनाचा थॉमस सँटियागो, नेदरलँड्सचा पिर्मिन ब्लाक आणि जर्मनीचा जीन-पॉल डॅनबर्ग हे शर्यतीत आहेत.

PR Sreejesh & Harmanpreet Singh
India Hockey Team: मेजर ध्यान चंद यांना त्रिवार अभिवादन! भारतीय हॉकीपटूच्या कृतीला सलाम
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.