India 29 Medals at Paris Paralympic 2024: पॅरिसमध्ये ऑलिम्पिकनंतर २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान पॅरालिम्पिक स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा भारतासाठी यशस्वी ठरली. यंदाच्या स्पर्धेत भारताचे ८४ खेळाडू १२ वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात सामील झाले होते. यामध्ये भारताच्या खेळाडूंनी मिळून तब्बल २९ पदके जिंकली.
त्यामुळे भारताचे हे पॅरालिम्पिकमधील सर्वोत्तम प्रदर्शन ठरले. यापूर्वी भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये १९ पदके (५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य) जिंकली होती. यंदा या विक्रमालाही मागे टाकत भारतीय खेळाडूंनी ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदके जिंकली.
अनेक भारतीय खेळाडूंनी नवे विक्रमही या स्पर्धेदरम्यान केले. यामध्ये सुमीत अंतील, कपील परमार, अवनी लेखरा, प्रीती पाल, नवदीप सिंग अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.