Cricket League: भारतात क्रिकेटच्या खेळपट्टीवरही जात-धर्म! सुरू झाली नवी कास्ट क्रिकेट लीग, गंभीरने केले उद्घाटन

  caste and religion cricket league
caste and religion cricket league sakal
Updated on

राजस्थानमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. प्रत्येक पक्ष अधिकाधिक लोकांना आपल्या बाजूने आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. मोठी मोठी आश्वासने देत आहेत, पण यावेळी राजकारणातही खेळांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या राजस्थानमध्ये कास्ट क्रिकेट लीग चर्चेत आहे. या क्रिकेट लीगमध्ये जात आणि धर्माच्या आधारे संघाला नाव देण्यात आले आहे.

जात आणि धर्माच्या आधारावर संघांची नावे

सांगानेर विधानसभेच्या 221 संघातील 3500 खेळाडू सहभागी होत आहेत. या संघांची 5 वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली आहे. पण या क्रिकेट लीगमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती या स्पर्धेत सहभागी असलेल्या काही संघांच्या नावांची. वास्तविक या क्रिकेट स्पर्धेत बहुतांश संघांची नावे जात आणि धर्माच्या आधारावर ठेवण्यात आली आहेत.

  caste and religion cricket league
Team India: टीम इंडियाला पुन्हा मिळणार आणखी एक नवा कर्णधार, 'या' मालिकेतून रोहित अन् पांड्याची सुट्टी?

SPL क्रिकेट स्पर्धेतील काही संघ आहेत- बैरवा स्ट्रायकर्स, चौहान नाईट रायडर्स, जय भीम, सनातनी बॉईज, खत्री ब्लास्टर्स, मारवाडी क्लब, टीम भगवा, भीम सेना, रॉयल आंबेडकर आणि तोंडवाल क्रिकेट क्लब.

सांगानेर प्रीमियर लीगच्या उद्घाटन सामन्यात माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर आला होता. दुसरीकडे भाजपचे विद्यमान आमदार अशोक लाहोटी हे आपल्या भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी या मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहेत. मानसरोवर येथील केएल सैनी स्टेडियमवर या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 221 संघ सहभागी होणार आहेत.

  caste and religion cricket league
WI vs IND: उपकर्णधार पद धोक्यात! रहाणे पुन्हा अयशस्वी, वेस्ट इंडिजमध्ये कारकीर्दीला लागणार पूर्णविराम

खेळाच्या नावाखाली राजकारण?

आमदार लाहोटी यांनी स्पर्धेतील काही संघांची नावे जातीच्या आधारावर ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर एका टीव्ही चॅनेलशीच्या बातमीनुसार अशोक लाहोटी म्हणाले की, हा एक खेळ आहे. भाजप आणि काँग्रेसला यात जोडू नका. लोकांनी स्वतः त्यांच्या संघांची नावे दिली आहेत. आम्ही त्यांना फक्त क्रिकेट लीगमध्ये सहभागी होण्याची संधी दिली आहे.

दुसरीकडे, काँग्रेसच्या समाज कल्याण मंडळाच्या अध्यक्षा अर्चना शर्मा म्हणतात की, हा निव्वळ राजकीय कार्यक्रम आहे. त्याचा खेळाशी काहीही संबंध नाही. जातीच्या आधारे संघनिवड आणि खेळामुळे सर्वसामान्यांमध्ये दुमत निर्माण होते. धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण करणे ही भाजपची जुनी परंपरा आहे. भाजपला याचा निवडणुकीत फायदा घ्यायचा आहे.

अशी क्रिकेट लीग आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ नाही, जिथे संघ धर्म आणि जातीच्या आधारावर आपले प्रतिनिधित्व करत आहेत. यापूर्वी स्वातंत्र्यलढ्यातही हे दिसून आले होते.

  caste and religion cricket league
Wi vs Ind 2nd Test : घर के शेर, बाहर ढेर... गिलचा एका निर्णय अन् करिअर आले धोक्यात?

जेव्हा गांधींनी हिंदू विरुद्ध मुस्लिम क्रिकेट लीग केली बंद

ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा भारताचे दिल दिल्ली तर संस्कृती पेशावर होती. भारताचे दोन भाग झाले नव्हते. देशात स्वातंत्र्यलढ्याचा बिगुल वाजला होता. स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र झाला होता. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प झाले. परिणामी 1939-40 मध्ये भारताचा MCC दौरा रद्द झाला आणि 1940 मध्ये भारताचा इंग्लंड दौरा रद्द झाला. मात्र पेंटांग्युलर टूर्नामेंट आणि रणजी ट्रॉफीसह देशांतर्गत क्रिकेट सुरूच राहिले. पण अशा तणावपूर्ण परिस्थितीत जेव्हा देश स्वातंत्र्यासाठी झगडत होता. त्यानंतर 1940 मध्ये पेंटांग्युलर टूर्नामेंट आयोजित करण्यावरून विरोध सुरू झाला.

महात्मा गांधींनीही मुंबईतील या प्रसिद्ध क्रिकेट स्पर्धेला कडाडून विरोध केला होता. वास्तविक या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या पाच संघांपैकी बहुतेक संघ धार्मिक आधारावर तयार करण्यात आले होते. उदाहरणार्थ हिंदू क्लब, मुस्लिम क्लब आणि पारसी इलेव्हन. पण आज पुन्हा एकदा भारतात जातीच्या आधारावर क्रिकेटचे आयोजन केले जात आहे. यावर तुमचे म्हणणे काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.