IND vs AUS 1st Test : अडीच दिवसात खेळ खल्लास! रोहित सेनेचा राजेशाही थाट

IND vs AUS 1st Test
IND vs AUS 1st Test esakal
Updated on

IND vs AUS 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने फक्त एकदाच फलंदाजी करत कांगारूंचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत आता 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. जरी भारताने एकाच डावात फलंदाजी केली असली तरी कांगारूंना 140 षटके तंगवले. दुसरीकडे दोन्ही डावात 97 षटकेच खेळलेल्या कांगारूंच्या बलाढ्य फलंदाजीला तीन दिवस देखील तग धरता आला नाही. त्यांचा अडीच दिवसातच बाजार उठला!

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या कांगारूंचा पहिला डाव 177 धावात संपवला. त्यानंतर आपल्या पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारत पहिल्या डावात 223 धावांची भक्कम आघाडी घेतली. यानंतर कांगारूंनचा दुसरा डाव 91 धावात संपवत दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याची तसदी घेतली नाही. विशेष म्हणजे पहिल्या डावात कांगारूंनी 64 षटके तर धरला तर दुसऱ्या डावात षटकेच खेळू शकले.

भारताकडून दुसऱ्या डावात अश्विनने 5 विकेट्स घेतल्या तर रविंद्र जडेजाने त्याला विकेट्स घेत चांगली साथ दिली. फलंदाजीत बोलायचे झाले तर रोहित शर्माने सर्वाधिक 120 धावा तर अक्षर पटेलने 84 आणि रविंद्र जडेजाने 70 धावांचे योगदान दिले.

IND vs AUS 1st Test
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शमीचे तुफान! कोहली-द्रविड ही पडले फिके

भारताने दुसऱ्या डावात 223 धावांची आघाडी घेतल्यानंतर कांगारूंनी त्यांचा दुसरा डाव सुरू केला. मात्र भारताच्या फिरकीपुढे कांगारूंची टॉप ऑर्डरन पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. अश्विनने उस्मान ख्वाजा (5), डेव्हिड वॉर्नर (10) आणि मॅट रेनशॉ (2) यांची शिकार केली. तर रविंद्र जडेजाने मार्नस लाबुशाने (17) ची मोठी विकेट घेतली. अश्विनने पीटर हँड्सकॉम्बला 6 धावांवर बाद करत कांगारूंची अवस्था 5 बाद 52 धावा अशी केली.

निम्मा संघ माघारी गेल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स आणि अॅलेक्स केरी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अश्विनने केरीला 10 धावांवर बाद करत आपली 5 वी शिकार केली. यानंतर रविंद्र जडेजाने कमिन्सला 1 धावेवर बाद करत कांगारूंची उरली सुरली आशा धुळीस मिलवली.

दुसरीकडे स्मिथ डावाने पराभव टाळण्यासाठी एक बाजू लावून धरत होता. मात्र इतर फलंदाजी हजेरी लावून जात होती. अखेर ऑस्ट्रेलियाचा डाव 91 धावात संपुष्टात आला. स्मिथने नाबाद 25 धावांची एकाकी झुंज दिली.

IND vs AUS 1st Test
Axar Patel IND vs AUS : ये तो धोती खोल रहा है... अक्षर पटेलच्या प्रतिक्रियेवर हास्यकल्लोळ

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 177 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 400 धावात संपुष्टात आला. रोहित शर्माने सर्वाधिक 120 धावा तर अक्षर पटेलने 84 आणि रविंद्र जडेजाने 70 धावांचे योगदान दिले. भारताने पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्सने 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

भारताने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 7 बाद 321 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाच्या टॉड मर्फीने रविंद्र जडेजाचा 70 धावांवर त्रिफळा उडवत भारताची आठव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी करणारी जोडी फोडली.

मात्र भारताचा डाव लवकरात लवकर गुंडाळण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यावर मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल यांनी पाणी फेरले. या दोघांनी नव्या विकेटसाठी अर्धशतकी (52) भागीदारी रचली. यात शमीच्या 37 धावांचे मोठे योगदान होते. अखेर मर्फीनेच शमीचा दांडपट्टा शांत केला.

शमी बाद झाला त्यावेळी भारताच्या 380 धावा झाल्या होत्या. त्यानंतर अक्षर पटेल आणि मोहम्मद शमी या शेवटच्या जोडीने अजून 20 धावा जोडत भारताला 400 पर्यंत पोहचवले. अक्षर पटेल त्याच्या शतकी खेळीच्या जवळ पोहचला होता. मात्र पॅट कमिन्सने त्याचा 84 धावांवर त्रिफळा उडवत भारताचा पहिला डाव 400 धावांवर संपवला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.