India Vs Malaysia Hockey : भारताचा विजयी चौकार; पिछाडी भरून काढत मलेशियाला दिली मात

India Vs Malaysia Hockey
India Vs Malaysia Hockeyesakal
Updated on

India Vs Malaysia Hockey : भारताने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या फायनल सामन्यात मलेशियाचे कडवे आव्हान मोडून काढत तब्बल चौथ्यांदा विजेतेपदला गवसणी घातली. भारत सामन्यात दुसऱ्या क्वार्टरपर्यंत 3 - 1 असा पिछाडीवर होता.

मात्र तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने शेवटच्या काही मिनिटात दोन गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये देखील अखेरच्या सत्रात भारताच्या आकाशदीपने गोल करत भारताला 4 - 3 असा विजय मिळवून दिला.

भारताकडून जुगराज सिंह (9'), हरमनप्रीत सिंह (45'), गुरजांत सिंह (45') आणि आकाशदीप सिंहने (56') गोल केले.

India Vs Malaysia Hockey
WI vs IND 4th T20I : शुभमन - यशस्वीची 165 धावांची सलामी; भारताचा मोठा विजय

क्वार्टर 1

भारत आणि मलेशिया यांच्यातील हिरो एशियन चम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या फायलन सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी दमदार खेळ केला. स्पर्धेत आक्रमक पद्धतीने खेळणाऱ्या भारताला आठव्या मिनिटालाच पेनाल्टी कॉर्नर मिळाला. हा पेनाल्टी कॉर्नर जुगराज सिंहने गोलमध्ये रूपांतरित केला. मात्र क्वार्टर संपण्यास एक मिनिट शिल्लक असतानाच मलेशियाच्या अझराई अबु कमालने मैदानी गोल करत बरोबरी साधली. भारताला या गोलची परतफेड करण्याची संधी 15 व्या मिनिटाला मिळाली होती. भारताला पेनाल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र भारताला गोल करता आला नाही. त्यामुळे पहिला क्वार्टर हा 1 - 1 असा बरोबरीत राहिला.

क्वार्टर २

दुसऱ्या क्वार्टरमध्ये मलेशियाने भारतीय संघाला जोरदार धक्के दिले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय बचावफळीने प्रतिस्पर्धी संघाला आपली गोल भेदण्याची फारशी संधी दिली नव्हती. मात्र मलेशियाने फायनलच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताची बचावफळी भेदली.

मलेशियाला 18 व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळाला होता. पहिल्या प्रयत्न फसल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात रहीम राझेने भारतावर दुसरा गोल करत 2 -1 अशी आघाडी घेतली. यानंतर मलेशियाला 24 व्या मिनिटाला देखील एक पेनाल्टी कॉर्नर मिळाला मात्र गोल करण्यात त्यांना अपयश आले.

27 व्या मिनिटाला पुन्हा एकदा मलेशियाला पेनाल्टी कॉर्नरद्वारे गोल करण्याची संधी मिळाली. ही संधी मोहम्मद अमिनुद्दीनेने ही संधी दवडली नाही. त्याने 28 व्या मिनिटाला गोल करत मलेशियाची आघाडी 3 - 1 अशी वाढवली.

India Vs Malaysia Hockey
Durand Cup 2023 East Bengal : अखेर इस्ट बंगालने 1658 दिवसांचा दुष्काळ संपवला; कट्टर प्रतिस्पर्धी मोहन बागानला चारली पराभवाची धूळ

क्वार्टर 3

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने मलेशियाने घेतलेली 3 - 1 ही आघाडी कमी करण्यासाठी चांगलाच जोर लावला. भारताला यासाठी दोन पेनाल्टी कॉर्नर देखील मिळाले. भारताला 32 व्या आणि 36 व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळाले होते. मात्र त्यांना गोल करण्यात अपयश आले. भारतासाठी पेनाल्टी कॉर्नर ही एक दुखरी नस झाली आहे.

43 व्या मिनिटाला मलेशियाला देखील पेनाल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र त्यांना देखील गोल करण्यात अपयश आले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये शेवटच्या मिनिटाला भारताला पुन्हा एकदा पेनाल्टी कॉर्नर मिळाला. ही संधी हरमनप्रीत सिंहने दवडली नाही. त्याने भारताचा दुसरा गोल करत आघाडी कमी केली. यानंतर लगेचच गुजांत सिंगने 45 व्या मिनिटाला मैदानी गोल करत मलेशियाशी 3 - 3 अशी बरोबरी साधली.

क्वार्टर 4

चौथ्या क्वार्टरमध्ये पहिली दहा मिनिटे दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. मलेशियाला 50 व्या तर भारताला 54 आणि 55 व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र दोघांनाही गोल करण्यात अपयश आले.

मात्र 56 व्या मिनिटाला भारताच्या आकाशदीप सिंहने मैदानी गोल करत भारताला मोक्याच्या क्षणी आघाडी मिळवून दिली. भारत आता 4 - 3 असा आघाडीवर होता. अखेर मलेशियाला ही एक गोलची पिछाडी भरून काढता आली नाही अन् त्यांचे पहिल्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.