IND vs PAK : पाकिस्तानला 'वजा' करत भारत गुणतालिकेत टॉपवर

IND vs PAK
IND vs PAKesakal
Updated on

IND vs PAK World Cup 2023 Point Table : भारताने वर्ल्डकप 2023 मधील आपला तिसरा सामना जिंकला. पाकिस्तानचा 7 विकेट्स आणि 19.3 षटके राखून पारभव करत भारताने दणदणीत रनरेट कमावले. याचा फायदा भारताला पाॉईंट टेबलमध्ये झाला आहे. भारत आता तीन पैकी तीन सामने जिंकून 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. भारताचे नेट रनरेट हे + 1.821 इतके आहे.

IND vs PAK
Sachin Tendulkar:माझ्या मित्रा तुझा सल्ला ऐकला अन्... सचिननं शोएबच्या त्या ट्विटला दिला करारा जवाब!

भारताने पाकिस्तानचा पराभव करत वर्ल्डकपमधील आपला तिसरा सामना जिंकला. याचबरोबर भारतीय संघ गुणतालिकेत 6 गुणांसह अव्वल स्थानावर पोहचला. भारतासोबतच न्यूझीलंडचे देखील सहा गुण झाले आहेत. मात्र त्यांचे नेट रनरेट हे +1.604 इतके आहे. भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्याने भारताचे नेट रनरेट हे + 1.821 इतके आहेत.

या दोन संघांनंतर तिसऱ्या क्रमांकावर आपले दोन्ही सामने जिंकून 4 गुणांसह दक्षिण आफ्रिका विराजमान आहे. मात्र पहिल्याच सामन्यात 428 धावा केल्याने त्यांचे नेट रनरेट हे +2.360 इतके तगडे आहे. त्यामुळे त्यांनी 17 तारखेचा नेदरलँडविरूद्धचा सामना जिंकला की ते पुन्हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर जातील.

गुणतालिकेत चौथ्या स्थानावर 3 पैकी 2 सामने जिंकणारा पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. मात्र त्यांचे नेट रनरेट हे -0.137 झाले असल्याने ते डेंजर झोनमध्ये आहेत.

IND vs PAK
IND vs PAK CWC 2023: वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार? अशा आहेत तीन शक्यता!

पाकिस्तानचे 192 धावांचे आव्हान पार करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावा ठोकल्या. त्यानंतर श्रेयस अय्यरने नाबाद 53 धावा ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

भारताने वर्ल्डकप 2023 च्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा डाव 191 धावात संपुष्टात आणत सामन्यावर पकड निर्माण केली. भारताकडून प्रमुख पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत पाकिस्तानी फलंदाजीचं कंबरडं मोडलं.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.