WI vs IND : भारताने मालिका घातली खिशात; चौथ्या सामन्यात विंडीजचा 59 धावांनी पराभव

India Defeat West Indies In 4th T20I Won Series
India Defeat West Indies In 4th T20I Won Series esakal
Updated on

West Indies Vs India : भारताने वेस्ट इंडीजला चौथ्या टी 20 सामन्यात 59 धावांनी मात देत मालिकेत 3 - 1 अशी विजयी आघाडी घेतली. भारताने वेस्ट इंडीज समोर विजयासाठी 192 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र विंडीजचा संघ 132 धावात ढेर झाला. भारताकडून अर्शदीप सिंगने 3 तर आवेश खान, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोईने 2 विकेट घतल्या. भारताकडून ऋषभ पंतने 44 तर संजू सॅमसनने नाबाद 30 धावा केल्या. रोहितनेही तडाखेबाज 33 धावा केल्या.

India Defeat West Indies In 4th T20I Won Series
CWG 2022 Day 9 Live : आज कुस्तीत सुवर्ण हॅट्ट्रिक; हॉकीतही पदक निश्चित

भारताचे 192 धावांचे आव्हान घेऊन मैदनात आलेल्या वेस्ट इंडीजला भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने धक्के दिले. आवेश खानने ब्रँडन किंगला 13 धावांवर बाद केले. आवेशने पाठोपाठ डेव्हॉन थॉमसला 1 धावेवर बाद करत दुसरा धक्का दिला.

त्यानंतर निकोलस पूरनने 8 चेंडूत 24 धावा चोपून आपले इरादे स्पष्ट केले. सॅसमन आणि पंतने त्याला धावबाद करत ही आक्रमक खेळी मोठी करू दिली नाही. पाठोपाठ अक्षर पटेलने कायल मेयर्सला 14 धावांवर बाद करत विंडीजची अवस्था 4 बाद 64 धावा अशी केली. त्यानंतर रोव्हमन पॉवलला 26 धावांवर बाद करत अक्षरने आपला दुसरा बळी टिपला.

अक्षर आणि आवेशच्या जोडीला आता अर्शदीप देखील आला होता. त्याने जेसन होल्डरला बाद करत विंडीजला सहावा धक्का दिला. रवी बिश्नोईने अकील हुसैनला 3 तर कर्णधार शमरोन हेटमयारला 19 धावांवर बाद करत विंडीजची अवस्था 8 बाद 116 धावा अशी केली. त्यानंतर अर्शदीपने विंडीजचा डाव 132 धावांवर संपवला. भारताने सामना 59 धावा जिंकला.

India Defeat West Indies In 4th T20I Won Series
CWG 2022 : नेव्हीच्या नवीनने पाकच्या कुस्तीपटूला लोळवत जिंकले सुवर्ण

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. रोहित शर्माने 16 चेंडूत 32 धावांची खेळी करत पाचव्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र अकील हुसैनने त्याला बाद करत भारताला पहिला धक्का दिला.

त्यानंतर सूर्यकुमार यादव देखील 24 धावांची भर घालून माघारी गेला. दरम्यान, दीपक हुड्डा आणि ऋषभ पंत यांनी डाव सावरत भारताला 12 व्या षटकात 108 धावांपर्यंत पोहचवले. मात्र अल्झारी जोसेफने दीपक हुड्डाला 21 धावांवर बाद केले. त्यानंतर ऋषभ पंतने 31चेंडूत 44 धावांची खेळी केली. भारत 150 धावांच्या जवळ असतानाच मॅकॉयने त्याला बाद केले.

यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकला (6) फारशी चमक दाखवता आली नाही. दरम्यान, स्लॉग ओव्हरमध्ये संजू सॅमसन आणि अक्षर पटेलने दमदार फलंदाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. या दोघांनी शेवटच्या दोन षटकात 27 धावा ठोकून भारताला 20 षटकात 5 बाद 191 धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.