IND vs ZIM : ग्रुप 2 मध्ये भारतच किंग! पाकिस्तानकडून अव्वल स्थान हिसकावले

India Vs Zimbabwe
India Vs Zimbabweesakal
Updated on

India Vs Zimbabwe : भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव करत ग्रुप 2 च्या अव्वल स्थानावर झेप घेतली. पाकिस्तानने बांगलादेशला हरवून 6 गुण घेत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र भारताने झिम्बाब्वाचा पराभव करत आपली गादी पुन्हा मिळवली. भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताने त्यांचा डाव 115 धावात गुंडाळला. भारत आता 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारत आता सेमी फायनलमध्ये 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरूद्ध खेळणार आहे.

India Vs Zimbabwe
Hardik Pandya : पांड्या 'फ्री' हिटवर झाला हिट विकेट; पुन्हा चर्चांना उधाण मात्र नियम काय सांगतो?

भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दोन षटकात झिम्बाब्वेला दोन धक्के दिले. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर विजली मॅधवरेला शुन्यावर बाद केले. तर अर्शदीप सिंगने देखील रेगिस चकाब्ववाला शुन्यावर बाद करत झिम्बाब्वेला दुसरा धक्का दिला.

भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंगने झिम्बाब्वेला दोन धक्के दिल्यानंतर हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमीने देखील आपले विकेटचे खाते उघडले. पांड्याने क्रेग एर्विन (13) तर शमीने सेन विलियम्सला (11) बाद केले. यानंतर शमीने टोनी मोन्योंगाला 5 धावांवर बाद करत झिम्बाब्वेची अवस्था 5 बाद 36 धावा अशी केली.

India Vs Zimbabwe
Hardik Pandya : भारत सेमी फायनलमध्ये पोहचला मात्र या हार्दिक पांड्याचं करायचं काय?

भारताचे वेगवान गोलंदाज झिम्बाब्वेला एका पाठोपाठ एक धक्के देत असताना अश्विननेही झिम्बाब्वेला तीन धक्के दिले. त्याने 22 चेंडूत 35 धावा करणाऱ्या रेयान बर्लला 14 व्या षटकात बाद केले. त्यानंतर 16 व्या षटकात मसाकाद्झा आणि नगारावाला प्रत्येकी 1 धावेवर बाद करत झिम्बाब्वेची अवस्था 8 बाद 106 धावा अशी केली. यानंतर पांड्याने 23 चेंडूत 34 धावा करून झुंज देणाऱ्या सिकंदर रझाला बाद करत भारताला विजयाच्या जवळ पोहचवले. त्यानंतर अक्षर पटेलने शेवटची विकेट घेत भारताला विजय मिळून दिला.

भारताने सुपर 12 फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेविरूद्ध आक्रमक सुरूवात केली. मात्र मधल्या षटकात भारताच्या पाठोपाठ तीन विकेट पडल्याने भारत अडचणीत आला होता. मात्र सूर्यकुमार यादवने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिला. सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 61 धावा ठोकत भारताला 186 धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.