India Vs New Zealand: विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड संघात सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. या सामन्याआधी अंकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर होता तर न्यूझीलंड पहिल्या स्थानी विराजमान झालेला होता. या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. त्याबरोबरच २०१९च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्यफेरीच्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढला.
न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करत भारताला २७४ धावांचं आव्हान दिलं होतं. विराट कोहलीच्या झुंजार ९५ धावांच्या खेळीमुळे भारताने हे आव्हान पार केले. या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली आपलं ४९वं शतक पूर्ण करेल, अशी आशा होती, पण शतकासाठी आणि संघाच्या विजयासाठी ५ धावांची गरज असताना तो बाद झाला.
न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना डॅरेल मिशेल याच्या शतकीय खेळीच्या जोरावर २७३ धावांपर्यंत मजल मारली होती. विश्वचषकाच्या या सामन्यात खेळवण्यात आलेल्या मोहम्मद शमीने न्यूझीलंडच्या बॅटिंग ऑर्डरचं कंबरड मोडत ५ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंड संघासाठी राचिम रवींद्र यानेही चांगली फलंदाजी करत आपल्या संघासाठी ७५ धावांचं योगदान दिलं. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.