Badminton Rankings: भारताच्या सात्विक-चिरागचा बॅडमिंटनमध्ये डंका कायम! पुन्हा मिळवला नंबर वनचा ताज

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty: बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत भारताची पुरुष दुहेरीतील जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मोठी झेप घेतली आहे.
Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty
Satwiksairaj Rankireddy and Chirag ShettyX/BAI_Media
Updated on

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty: भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी गेल्या काही वर्षात मोठे यश मिळवले आहे. आता त्यांची जोडी सध्या शानदार फॉर्ममध्येही आहे. नुकतेच त्यांनी आता जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुरुष दुहेरीमध्ये पुन्हा एकदा अव्वल क्रमांक मिळवला आहे.

त्यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये अव्वल क्रमांकावर हक्क सांगितला होता. परंतु, नंतर त्यांची क्रमवारी घसरली होती. सात्विकच्या दुखापतीमुळेही त्यांना काही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

पण त्यांनी थायलंड ओपन 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकत पुन्हा एकदा क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्यांची बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवणारी पहिलीच भारतीय जोडी आहे.

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty
RR vs RCB Eliminator : कोणता रॉयल होणार 'इलिमिनेट', धडाकेबाज RCB समोर राजस्थान कामगिरी सुधारणार का?

थायलंड ओपनमधील पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात सात्विक आणि चिराग यांनी चीनची जोडी चॅन बो यँग आणि लियू यी यांचा पराभव केला.चिराग - सात्विकने चीनच्या जोडीला 21-15, 21-15 अशा सरळ गेममध्ये पराभूत केले होते. यासह त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली होती.

या विजेतेपदानंतर त्यांना क्रमवारीत फायदा झाला आणि त्यांनी दोन स्थानांची प्रगती करत अव्वल क्रमांक पटकावला. त्यांचे आता 99,670 पाँइंट्स झाले आहेत.

या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर लियांग वेई केंग-वँग चँग ही चीनची जोडी असून त्यांचे 99, 618 पाँइंट्स आहेत, तर तिसऱ्या क्रमांकार कोरियाची जोडी कँग मिन ह्युक - सेओ सेउंग जी ही जोडी असून त्यांचे 98,015 पाँइंट्स आहेत.

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty
IPL Qualifier 1: मिचेल स्टार्कची 24 कोटी वसूल करणारी कामगिरी! हेडचा त्रिफळा उडवलाच, पण KKR लाही दिली स्वप्नवत सुरुवात

या बॅडमिंटन क्रमवारीत पुरुष एकेरीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये भारताचा एकमेव खेळाडू एच एस प्रणॉय आहे. तो 9 व्या क्रमांकावर आहे. महिला एकेरीत पहिल्या 10 मध्ये एकही भारताची खेळाडू नाही. भारताची दोनवेळची ऑलिम्पिक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू 15 व्या क्रमांकावर आहे.

महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही भारताची कोणतीही जोडी अव्वल 10 मध्ये नाही. पण असे असले तरी महिला दुहेरीत भारताची तिनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पाने प्रगती केली आहे. त्यांची जोडी 19 व्या क्रमांकावर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()