Sports News on 15th October 2024: भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात ते कोल्हापूरच्या कन्येने जिंकले रौप्यपदक

Sports News on 15th October 2024: १५ ऑक्टोबर रोजी क्रीडा विश्वात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घ्या.
top10 news
top10 newsesakal
Updated on

T20 World Cup 2024 To ISSF World Cup Final 2024: भारतीय संघाचे महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात बाबर आझमच्या जागी पाकिस्तान संघात स्थान देण्यात आलेल्या कामरान घुलामने पदार्पण डावातच शतक झळकावले. २०२३ वर्ल्ड कपदरम्यान बांगलादेशच्या क्रिकेटपटूला कानाखाली मारल्यामुळे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा यांना निलंबित करण्यात आले आहे. नेमबाज सोनम उत्तम मस्करने ISSF World Cup Final 2024 स्पर्धेत १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकले आहे...आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..

T20 World Cup 2024 : भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना गमवल्यानंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरी गाठण्याचे गणित पाकिस्तान संघावर अवलंबून होते. पण, काल पाकिस्तान संघ न्युझीलंडविरूद्धच्या सामन्यात पराभूत झाला. त्यामुळे भारतीय संघाचे महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे व 'अ' गटातून ऑस्ट्रेलियासोबत न्युझीलंड संघ उपांत्या फेरीमध्ये दाखल झाला आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

top10 news
अनफिट Mohammed Shami, आम्हाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घेऊन जायचा नाही; Rohit Sharma स्पष्टच म्हणाला
top10 news
PAK vs ENG 2nd Test : कोण आहे Kamran Ghulam? पहिल्याच कसोटीत Century अन् Babar Azam च्या स्थानाला दिले आव्हान
top10 news
Video Viral: परंपरा कायम! पाकिस्तानच्या पुरुष व महिला क्षेत्ररक्षकांमध्ये काहीच फरक नाही; चेंडू अडवण्यासाठी धडाम धुडूम होतंच...

ISSF World Cup Final 2024: नेमबाज सोनम उत्तम मस्करने ISSF World Cup Final 2024 स्पर्धेत भारताला १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकून दिले. २२ वर्षीय सोनमने अंतिम फेरीत २५२.९ गुणांसह रौप्यपदक मिळवले. चीनच्या युटींग हुआंगने सुवर्णपदक जिंकले, तर फ्रान्सच्या ओसिने मुलरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सोनम मस्कर कोल्हापूरची कन्या असून तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची व देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

top10 news
Table Tennis: पाचवी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या शौरेन सोमण याला दुहेरी मुकुट; तर ऋग्वेद दांडेकरला उपविजेतेपद
top10 news
Success Story : सातपुड्यातील आदिवासी तरुणीची गगन भरारी! दिव्या पावराची राज्य महिला फुटबॉल संघात निवड
top10 news
इम्पॅक्ट प्लेअरचा नियम अखेर रद्द! BCCI ने भारतातील टी२० स्पर्धेसाठी घेतला मोठा निर्णय

Bangladesh Cricket: भारताविरूद्धच्या कसोटी व ट्वेंटी-२० मालिकेत बांगलादेशचा एकतर्फी पराभव झाल्यानंतर अचानक बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून निलंबित करण्यात आले आहे. भारतात झालेल्या २०२३ च्या वर्ल्ड कपदरम्यान बांगलादेशच्या क्रिकेटपटूला कानाखाली मारल्यामुळे हथुरुसिंघाला निलंबित करण्यात आले आहे, अशी काही अहवालांद्वारे माहिती समोर येत आहे. तर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हथुरुसिंघा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

top10 news
IND vs NZ 1st Test : शुभमन गिल पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता; नेमकं असं काय घडलं अन् मग Playing XI मध्ये कोणाला मिळणार संधी?
top10 news
IND vs NZ: टीम इंडियाची प्लेइंग-११ पहिल्या कसोटीसाठी कशी असणार? रोहित सांगितला प्लॅन
top10 news
PAK vs ENG: सईम आयूब, कामरान घुलाम या नवख्या खेळाडूंनी पाकिस्तानला सावरले; पहिल्या दिवसाअंती केल्या २५९ धावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.