Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

India vs Japan Women's Hockey: महिला आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने जपानवर २-०ने मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
India Women's Hockey Team
India Women's Hockey TeamSakal
Updated on

Women’s Asian Champions Trophy 2024: गतविजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवारी जपान महिला संघावर २-० असा विजय साकारत आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

नवनीत कौर (४८वे मिनिट) व लालरेमसियामी (५६वे मिनिट) यांनी केलेले गोल भारताच्या उपांत्य फेरीतील विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

जपानविरुद्धच्या उपांत्य झुंजीत भारतीय महिला संघाने आश्‍वासक सुरुवात केली. नवनीत कौर व संगीताकुमारी यांनी गोल करण्याचा प्रयत्न केला, पण दोघींनी मारलेल्या फटक्यांवर जपानच्या गोलरक्षकाकडून बचाव करण्यात आला.

पहिले क्वार्टर संपायला चार मिनिटे बाकी असताना भारतीय महिला संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण दीपिकाला यावर गोल करता आला नाही. जपानची गोलरक्षक यू कुडो हिने अभेद्य बचाव केला. त्यामुळे पहिल्या क्वार्टरनंतर गोलशून्य बरोबरी झाली.

India Women's Hockey Team
Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.