ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

India at ISSF World Cup 2024: दिल्लीत झालेल्या नेमबाजी विश्‍वकरंडकात भारत एकूण चार पदकांसह पदकतालिकेत नवव्या स्थानी राहिला.
Vivaan Kapoor, Anant jeet Singh
Vivaan Kapoor, Anant jeet SinghSakal
Updated on

ISSF World Cup 2024: विवान कपूर व अनंतजीत सिंग नरूका या नेमबाजांनी शूटिंग रेंजवर दमदार कामगिरी करीत विश्‍वकरंडकात भारताला आणखी दोन पदके मिळवून दिली. विवान कपूरने पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात रौप्य आणि अनंतजीत सिंग नरूकाने पुरुषांच्या स्कीट प्रकारात ब्राँझपदक पटकावले.

भारत एकूण चार पदकांसह पदकतालिकेत नवव्या स्थानी राहिला. चीनने एकूण आठ पदकांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. गुरुवारी स्पर्धेचा शेवटचा दिवस होता.

पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात चीनच्या कि यिंग याने ४७ गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. भारताच्या विवान कपूरने ४४ गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली. तुर्कीच्या तोल्गा तन्सेर याने ३५ गुणांसह ब्राँझपदकाला गवसणी घातली.

Vivaan Kapoor, Anant jeet Singh
Latest Maharashtra News Updates : ISSF विश्वचषक फायनल २०२४ च्या पहिल्या दिवशी सोनम उत्तम मस्करने रौप्यपदक जिंकले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.