Asian Champions Trophy: भारतीय संघाकडून चीनचा दारुण पराभव, हरमनप्रीतच्या संघाची विजयी सुरुवात

India vs China Hockey: भारताच्या हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात यजमान चीनला पराभवाचा धक्का दिला आहे.
India Hockey Team
India Hockey TeamSakal
Updated on

India Hockey Team: रविवारपासून (८ सप्टेंबर) आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ हॉकी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारताने आपल्या पहिल्याच सामन्याच चीनला पराभवाचे पाणी पाजले. या सामन्यात भारताने ३-० अशा गोल फरकाने विजय मिळवला.

भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाने रविवारी चीनविरुद्ध झालेल्या सामन्यात पूर्ण वर्चस्व राखल्याचे दिसले.

यंदाच्या स्पर्धेत हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वातील भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय संघ आपले विजेतेपद राखण्याच्या हेतूने या स्पर्धेत उतरले आहेत.

चीनमधील मोची ट्रेनिंग बेस येथे झालेल्या या सामन्यात भारताकडून अभिषेक, उत्तम सिंग आणि सुखजीत यांनी गोल केले.

India Hockey Team
Major Dhyan Chand: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना खेळताना पाहिलंय का? हॉकी इंडियाने शेअर केला Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.