Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Olympic 2036 : ऑलिम्पिक २०३६ च्या आयोजनासाठी भारत उत्सुक असून यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला पत्र पाठवल्याची बातमी समोर येत आहे.
olympic 2036
olympic 2036esakal
Updated on

Olympic 2036 Hosting In India: भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) २०३६ च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे (IOC) इच्छा व्यक्त केली. सूत्रांच्या माहितीनुसार, २०३६ मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्याची भारताची इच्छा आहे, असे पत्र १ ऑक्टोबर २०२४ रोजी ऑलिम्पिक समितीला पाठवण्यात आले आहे.

भारत सरकारला आशा आहे की २०३६ च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळेल आणि यामुळे संपूर्ण देशामध्ये आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणासाठी फायदा होईल.

olympic 2036
Paris Olympic 2024 : सुवर्णपदकाचे मृगजळ

पंतप्रधान मोदींचे स्वप्न

२०२३ मध्ये मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC)च्या वार्षिक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०३६ उन्हाळी ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी भारत इच्छुक असल्याचे सांगितले. यावेळी "२०३६ समर गेम्स होस्टिंग राइट्सचा लिलाव जिंकण्यात भारत कोणतीही कसर सोडणार नाही." असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

“भारत ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी खूप उत्सुक आहे. २०३६ ऑलिम्पिक आयोजित करण्याच्या प्रयत्नांमध्ये भारत कोणतीही कसर सोडणार नाही. हे १४० कोटी भारतीयांचे स्वप्न आहे आणि आयओसीच्या पाठिंब्याने आम्हाला हे स्वप्न पूर्ण करायचे आहे.'

'खेळ हा केवळ पदके जिंकण्यासाठी नसून मन जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. खेळ चॅम्पियन्ससोबतच आनंदही देतो.” मोदी म्हणाले.

olympic 2036
Paris Olympic गाजवणाऱ्या नेमबाजांना लाखोंची बक्षीसं जाहीर; मनू भाकर, स्वप्नील कुसाळे अन् सरबज्योतला किती पैसे मिळणार ?

आयोजनाबाबत ‘इंटरेस्टेड पार्टी’या प्रकरणात भारतला सुधारणा करण्यात IOC भारताला मदत करेल. त्यानंतर सखोल अभ्यास केला जाईल. ज्यामध्ये स्थळ खर्च, लोकांचे मत आणि संभाव्य पर्यावरणीय परिणाम यांचाही विचार केला जाईल. त्यानंतर IOC सभेमध्ये मतदानाद्वारे यजमान निवडला जाईल.

भारताने पत्राद्वारे २०३६ ऑलिम्पिकची अनौपचारिक बोली जुलै २०२४ मध्ये लावल्याचे करत आहे. आगामी ऑलिम्पिक आयोजनासाठी IOA आणि IOC यांच्यातील संवाद जुलै २०२४ मध्येच सुरू झाला आहे, असे सुत्रांमार्फत कळत आहे.

२०३६ ऑलिम्पिकचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात येणार असून नवीन प्रकल्पांचे बांधकाम आधीच सुरू झाल्याचे बांतम्यांमधून समोर येत आहे..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()