आयर्लंडमधील दुसरा सामनाही रात्री जागवणार; काय सांगतोय हवामान विभाग?

India Ireland 2nd T20I What Is The Forecast Of Rain
India Ireland 2nd T20I What Is The Forecast Of Rain esakal
Updated on

डब्लिंग : भारताचा टी 20 संघ सध्या आयर्लंडमध्ये दोन सामन्यांची मालिका खेळत आहे. आज या मालिकेतील दुसरा सामना डब्लिंग येथे भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरू होणार आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आल्यामुळे सामना उशिरा सुरू झाला. तसेच सामना प्रत्येकी 12 षटकांचा करण्यात आला. हा सामना साधारणपणे 11.30 ला सुरू झाला. त्यामुळे भारतातील क्रिकेट चाहत्यांचे जागरण झाले. (India Ireland 2nd T20I What Is The Forecast Of Rain)

India Ireland 2nd T20I What Is The Forecast Of Rain
पंत परिपक्व नाही, त्याला कर्णधार करू नका : कनेरिया

आज होणाऱ्या दुसऱ्या टी 20 सामन्यात देखील पाऊस पडला तर भारतातील क्रिकेट चाहत्यांचे पुन्हा रात्री उशिरापर्यंत जागरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातील क्रिकेट चाहत्यांचे सामन्याबरोबरच आयर्लंडमधील हवामान विभागाच्या अंदाजावरही बारीक लक्ष असणार आहे.

सध्या तरी आयर्लंडच्या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या अनेक संस्थांनी आज पाऊस पडणार नसल्याचे सांगितले आहे. आजचा सामना आयर्लंडच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 4 ते रात्री 8 या वेळेत होणार आहे. तर हाच सामना भारतीय वेळानुसार रात्री 9 वाजता सुरू होणार आहे.

India Ireland 2nd T20I What Is The Forecast Of Rain
इंग्लंडच्या सुंदर क्रिकेटपटू सोबत अर्जुन तेंडुलकरचे लंडन 'पर्यटन'

आयर्लंडमध्ये सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजे पर्यंत सर्वसाधारण तापमान हे 17 ते 18 डिग्री सेल्सियस असणार आहे. तर आद्रता 60 ते 64 टक्क्यांच्या आसपास असणार आहे. या अंदाजामध्ये 10 टक्के बदल होण्याची देखील शक्यता आहे. मात्र सामन्याच्या शेवटी म्हणजे रात्री 8 वाजता पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची देखील शक्यता वर्तवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()