India Open 2022 : भारतीय जोडगोळीनं पटकावलं विक्रमी जेतेपद

India Open Badminton 2022
India Open Badminton 2022Sakal
Updated on

India Open 2022 : भारतीय बॅडमिंटन स्टार चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकिरेड्डी जोडीनं India Open 2022 बॅडमिंटन स्पर्धेत कमाल करुन दाखवली. भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीत तीन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन्सला पराभवाचा दणका देत विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील दुसऱ्या मानांकित जोडीने अव्वल मानांकित मोहम्मद अहसान आणि हेंड्रा सेतियावान जोडीला 21-16, 26-24 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. (india open badminton 2022 indian duo of satwiksairaj rankireddy chirag shetty win mens doubles title)

भारतीय जोडीने पहिल्या सेटपासून आक्रमक आणि दमदार खेळ दाखवला. त्यांच्या या खेळीमुळे इंडोनेशियन जोडी बॅकफूटवर गेली. या जोडीनं पहिला सेट 21-16 असा जिंकला. त्यानंतर अहसान-हेंड्रा जोडीनं दुसऱ्या सेट्टमध्ये चांगली टक्कर दण्याचा प्रयत्न केला पण अखेर भारतीय जोडीच त्यांच्यावर भारी पडली.

जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानावर असलेल्या भारतीय जोडीनं फायनलमध्ये दिमाखदार खेळ केला. त्यांनी 43 मिनिटातच प्रतिस्पर्ध्याच्या इराद्यांवर पाणी फेरत मैदान मारुन दाखवले. या विजयासह चिराग-सात्विक जोडीनं नवा विक्रमही प्रस्थापित केला. इंडिया ओपन स्पर्धा जिंकणारी ही भारताचा पहिली जोडी ठरलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.