सात वर्षांच्या बंदीनंतर नंतरही क्रिकेटच्या मैदानात परतण्याच्या संधीची वाट बघणारा श्रीसंत अखेर थकला आहे. एस श्रीसंतनं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून त्याने निवृत्ती घेतली आहे. 2007 मध्ये T20 वर्ल्ड कप आणि 2011 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य राहिला आहे. 2013 मध्ये आयपीएल दरम्यान तो स्पॉट फिक्सिंगच्या आरोपात अडकला होता.
आयपीएल स्पॉटफिक्सिंक प्रकरणानंतर बीसीसीआयने त्याच्याविरोधात कठोर पावले उचलली होती. त्याच्यावर आजीवन बंदीची कारवाई करण्यात आली. या निर्णयाला त्याने न्यायालयात आव्हान दिले. कोर्टातील लढाई जिंकून तो 7 वर्षांनी पुन्हा मैदानातही उतरला. पण अखेर त्याने आता क्रिकेटमधून थांबण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्त होत असल्याची घोषणा केलीये.
एस श्रीसंत ट्विटरच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा करताना भावनिक संदेशही लिहिलाय. आज माझ्यासाठी खूप कठिण दिवस आहे. पण हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचाही असल्याचे मानतो. केरळ, बीसीसीआय, वारविकशायर, भारतीय एयर लाइन्स टीम आणि आयसीसीचा आभारी आहे. आयसीसीने मला सन्मान दिला. एक क्रिकेटच्या नात्याने 25 वर्षांच्या कारकिर्दीत मैदानात पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलो. प्रामाणिकपणे खेळण्याचा प्रयत्न केला, असा उल्लेख श्रीसंतने आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या श्रीसंतने मिनी लिलावात दुर्लक्ष झाल्यानंतर यंदाच्या मेगा लिलावात पुन्हा एकदा नाव नोंदणी करुन क्रिकेट खेळण्याची इच्छा पुन्हा एकदा दाखवून दिली होती. पण त्याचा पत्ता यावेळीही कट झाला. तो रणजी सामन्यात मैदानातही उतरला. रणजी सामन्यात दुखापत झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्याने काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता त्याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.