आईसह बहीणसुद्धा गेली, कोरोनाने वेदावर कोसळला दु:खाचा डोंगर

आपल्या बहिणीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती वेदाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.
Veda Krishnamurthy
Veda KrishnamurthyInstagram
Updated on

कोरोनामुळे (Corona) भारतीय महिला संघाची स्टार क्रिकेटर वेदा कृष्णमूर्ती (Veda Krishnamurthy) हिच्यावर मोठ संकट कोसळले आह. कोरोनामुळे आईचे निधन झाल्यानंतर आता तिच्या बहीणीचाही यात मृत्यू झालाय. वेदा कृष्णमूर्ती हिच्या बहिणीला कोरोनाची लागण झाली होती. बऱ्याच दिवसांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. भारतीय महिला संघातील अष्टपैलू वेदाचा कोविड 19 रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. आपल्या बहिणीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती वेदाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. बंगळुरुच्या या महिला क्रिकेटरने (women's cricket ) मागील महिन्यातच आपल्या आईला गमावले होते. तिच्या आईचा मृत्यूही कोरोनामुळेच झाल्याचे समोर आले होते.

Veda Krishnamurthy
IPL 2021: आता स्पर्धा UAE त होणार? गांगुली म्हणाले...

वेदाने मागील महिन्यात एक ट्विट केले होते. यात तिने लिहिले होते की, आई आमच्यातून निघून गेली. आईशिवाय सर्व काही शून्य आहे. आई गेल्याच्या दुख:तून सावर आता आम्ही बहिण कोरोनातून सावरण्यासाठी प्रार्थना करत आहोत. माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. माझ्याप्रमाणे कठीण परिस्थितीचा सामना करत असलेल्या प्रत्येकासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते, असा उल्लेखही वेदाने ट्विटमध्ये केला होता.

Veda Krishnamurthy
हत्याप्रकरणात ऑलिम्पिकवीर सुशील कुमारवर अटकेची टांगती तलवार

देशभरात वेगाने वाढत असलेल्या कोरोनामुळे अनेकांनी जीव गमावले आहेत. कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत आयपीएल स्पर्धा सुरु होती. पण बायो-बबबला छेद देऊन या स्पर्धेत खेळणाऱ्या काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. एकामागून एक खेळाडूंचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआयने अखेर आयपीएल स्पर्धा तात्पूर्ती स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.