India Team Announced Asia Cup 2022 : संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. संघात धावांसाठी झगडणाऱ्या विराट कोहलीचे (Virat Kohli) पुनरागमन झाले आहे. स्टार फलंदाज केएल राहुलचे १५ सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे राहुल बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.
भारतीय संघातील वरिष्ठ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आशिया कप टी 20 स्पर्धेला (Asia Cup 2022) मुकणार आहे. त्याला पाठीच्या दुखण्यातून (Back Injury) तो अजून सावरला नसल्याने तो आशिया कप खेळणार नाही. संघ जाहीर झाल्याने आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचे अनेक खेळाडूंचे स्वप्नही भंगले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघात युवा फलंदाज इशान किशन, व्यंकटेश अय्यर, यष्टिरक्षक संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड यांना स्थान मिळालेले नाही. याशिवाय अष्टपैलू शार्दुल ठाकूर, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, उमरान मलिक यांनाही संघात स्थान मिळालेले नाही.
जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हते, असे बीसीसीआयने म्हटले आहे. दोघेही सध्या बंगळुरू येथील एनसीएमध्ये आहे. या स्पर्धेसाठी संघात तीन गोलंदाजांचा समावेश करण्यात आला असून त्यात भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान आहे.
आशिया कपसाठीचा भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.