IND vs GER Hockey : भारतीय संघाने ५-३ असा जर्मनीवर विजय मिळवला, तरीही चषकापासून वंचित राहिला

India vs Germany Hockey Series : ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाने घरच्या मैदानावरील जर्मनीविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत ५-३ असा दणदणीत विजय मिळवला, परंतु ट्रॉफी पासून वंचित राहिला.
india vs germany
india vs germanyesakal
Updated on

India vs Germany Hockey : भारतीय पुरुष हॉकी संघाने दुसऱ्या लढतीत जर्मनीवर ५-३ असा विजय मिळवला. भारताला मालिकेतील पहिल्या सामन्यात २-०ने पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली. ट्रॉफी कुणाची, याचा फैसला पेनल्टी शूट आऊटमध्ये झाला आणि त्यात जर्मनीने ३-१ अशी बाजी मारली.

जर्मनीने गोल करून सामन्याची सुरूवात केली. त्यानंतर भारताला पेनल्टी कॉर्नवर बरोबरीची संधी अनेकदा मिळाली, परंतु त्यांना बरोबरीचा गोल करता आला नाही. पहिल्या सत्रात भारत ०-१ असा पिछाडीवर होता.

मध्यंतरानंतर भारताने सामन्यात पुनरागमन करण्याचे जोरदार प्रयत्न केले आणि तिसऱ्या सत्रात सुखजीतच्या गोलने १-१ बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोलमध्ये रूपांतर केले. पुढे २-२ मिनिटांच्या फरकाने भारताला आणखी २ पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि भारताने यशस्वी गोल केले. तिसऱ्या सत्राच्या शेवटी भारताने ४-१ अशी मजबूत आघाडी घेतली होती.

चौथे सत्र सुरू होताच सुखजीतने भारतासाठी पाचवा गोल केला. त्यानंतर जर्मनीने सलग दोन गोल केले, परंतु भारताने सामना ५-३ ने जिंकला. भारताच्या विजयामुळे मालिका बरोबरीत सुटली आणि मालिकेचा निर्णय पेनल्टी शूट आऊटने करण्यात आला. पेनल्टी शूट आऊटमध्ये भारताला ५ पैकी एकाच संधीवर गोल करता आला, तर जर्मनीने ३ गोल करून मालिका जिंकली.

india vs germany
Hockey IND vs GER: विश्‍वविजेत्यांकडून भारतीय हॉकी संघाचा पराभव; मालिकेतही घेतली आघाडी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.