India Tour Of South Africa : दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉनच्या दहशतीत देखील भारतीय संघाचा आफ्रिका दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ दौऱ्याला जाईल, हे स्पष्ट करताना 4 सामन्यांची टी-20 मालिकेचे वेळापत्रक नंतर निश्चित करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिलीये. एएनआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआय BCCI सचिव जय शाह (BCCI Chief Jay Shah) म्हणाले की, भारत (Team India) तीन कसोटी आणि तीन ODIS सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका (South Africa) दौरा करेल. सध्याच्या घडीला टी-20 सामन्यांच्या मालिकेच्या तारखांसदर्भात कोणताही विचार करण्यात आलेला नाही.
सध्याच्या घडीला भारताचा अ संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ओमिक्रॉनची दहशत निर्माण झाल्यामुळे अनेक देश दक्षिण आफ्रिकेतील हवाई वाहतूकीवर निर्बंध लादत असताना बीसीसीआयने दौरा कायम ठेवला. यासंदर्भात दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयचे आभार मानले होते. या गोष्टीमुळे भारतीय वरिष्ठ संघ डिसंबरमध्ये ठरल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिका दौरा करेल, हे निश्चित होते. त्याला जय शहा यांनी पुष्टी दिलीये. या दौऱ्यात काही बदल होणार का? दौरा ठरलेल्या तारखेला सुरु होणार की पुढे ढकलणार? याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण बीसीसीआयकडून देण्यात आलेले नाही.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी आणि वनडे मालिकेसाठी एकाच वेळी टीम निवड केली जाण्याची शक्यता आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना एकत्र दौऱ्यावर जाण्यासाठी बीसीसीआयकडून एकाच वेळी दोन्ही संघाची घोषणा केली जाऊ शकते. यामुळे खेळाडूंना एकत्र प्रवास करण्यासह नियमावलीसह बायोबबलचा कालावधीही पूर्ण करणे सहज आणि सुलभ होईल. बीसीसीआयने अभैद्य जैव सुरक्षितता वातावरण निर्माण करण्याची विनंतीही बीसीसीआयला केली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ जोहानन्सबर्ग, सेंच्युरियनशिवाय केप टाउन आणि पर्लमध्ये सामने खेळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.