रोहित भाऊ जागा दे की! जाफरनं घेतली पृथ्वीची फिरकी

संघात सामील झालेल्या युवा सलामीवीर पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवला बाकावरच बसावे लागेल.
Rohit Sharma And Prithvi Shaw
Rohit Sharma And Prithvi ShawTwitter
Updated on

India tour of England, 2021 : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतलीये. पहिल्या कसोटी सामन्यात पाऊस भारताच्या विजयाआड आला. त्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानात पराभवाच्या खाईतून बाहेर पडत टीम इंडियाने दिमाखदार विजय नोंदवला. या विजयानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फार काही बदल होईल असे वाटत नाही. रविंद्र जडेजाच्या जागी आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा लोकेश राहुलच्या साथीनं करेल. याचा अर्थ दुखापतग्रस्त शुभमन गिल आणि वाशिंग्टन सुंदरच्या जागी संघात सामील झालेल्या युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादवला (Surya Kumar Yadav) बाकावरच बसावे लागेल.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या वासीम जाफरला (Wasim Jaffer) देखील असेच वाटते. पण त्याने आपल्या खास अंदाजात आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. यासाठी त्याने एका फोटोचा आधार घेतलाय. वासीम जाफरने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक फोटो शेअर केलाय. यात युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा रोहित शर्मांच्या मांडीवर बसल्याचे दिसते. "भैय्या उठ आणि मला जागा दे ना! अशा कॅप्शनसह जाफरने हा फोटो शेअर केलाय. त्याच्या या ट्विटला चांगलीच पसंती मिळताना दिसते.

Rohit Sharma And Prithvi Shaw
अँडरसन-बुमराहमध्ये काय झाला राडा? अश्विनने सांगितला किस्सा
Rohit Sharma And Prithvi Shaw
T20 World Cup: विराट, रोहित नव्हे तर 'या' खेळाडूवर असेल लक्ष!

इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियातील तीन खेळाडूंनी दुखापतीमुळे माघार घेतली होती. यात युवा सलामीवीर शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांचा समावेश होता. या तिघांच्या जागी बीसीसीआयने पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव या मुंबईच्या जोडगोळीला टीम इंडियाला बॅकअप देण्यासाठी निवडले. धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यात मर्यादित षटकांची मालिका खेळून ही जोडी थेट इंग्लंडला रवाना झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये आल्यानंतर त्यांना क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करावा लागला. हा कालावधी पूर्ण केल्यानंतर दोन्ही खेळाडू टीम इंडियाच्या ताफ्यात सहभागी झाले. लॉर्ड्सच्या मैदानात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ते संघातील इतर सहकाऱ्यांसोबत ड्रेसिंग रुममध्ये दिसले होते. टीम इंडियाची सध्याच्या प्लेइंग इलेव्हन पाहता या दोघांना संधी मिळणे खूपच कठीण दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.