India Tour Of South Africa : बॉक्सिंग डे कसोटी अन् नववर्षाचं स्वागत... दक्षिण आफ्रिका दौऱ्याची तारीख ठरली!

India Tour Of South Africa
India Tour Of South AfricaEsakal
Updated on

India Tour Of South Africa Schedule Announce : बीसीसीआयने नुकतेच भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. भारताचा हा दौरा 10 डिसेंबर 2023 पासून 7 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे.

या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी 20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघ 2024 चे स्वागत हे केप टाऊन येथून करणार आहे. यापूर्वी भारत 26 डिसेंबरला सेंच्युरियनवर बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळले.

India Tour Of South Africa
West Indies vs India 1st Test : वेस्ट इंडीज 3 दिवसातच गारद; भारताचा एक डाव अन् 141 धावांनी दणदणीत विजय

भारत दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या दरम्यान होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ सर्व क्रिकेट फॉरमॅटमधील मालिका खेळणार आहे. याबाबत बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले, 'द फ्रीडम सिरीज ही फक्त दोन उत्तम कसोटी संघांमधील मालिका नाही तर ही सिरीज महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला या दोन महान नेत्यांना आदर देणारी सिरीज आहे.'

'या दौऱ्यातील बॉक्सिंग डे कसोटी आणि नवीन वर्षातील पहिली कसोटी सर्वात महत्वाचा भाग आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडर आणि वेळापत्रक हे या दृष्टीकोणातूनच प्लॅन केलेले असते.'

'भारताला दक्षिण आफ्रिकेने कायमच भक्कम पाठिंबा दिला आहे. मला विश्वास आहे की ही मालिका प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरेल.' (BCCI Secretary Jay Shah News)

India Tour Of South Africa
बीसीसीआयने अचानक बदलले 'या' खेळाडूचे नशीब, ODI संघाचे सोपवले कर्णधारपद!

भारत - दक्षिण आफ्रिका मालिका संपूर्ण वेळापत्रक :

टी 20 मालिका

पहिला टी 20 सामना, 10 डिसेंबर 2023, डर्बन

दुसरा टी 20 सामना 12 डिसेंबर 2023, गेकेबेरा (पोर्ट एलिझाबेथ)

तिसरा टी 20 सामना 14 डिसेंबर 2023, जोहन्सबर्ग

वनडे मालिका

पहिला वनडे सामना, 17 डिसेंबर 2023, जोहान्सबर्ग

दुसरा वनडे सामना, 19 डिसेंबर 2023, गेकेबेरा (पोर्ट एलिझाबेथ)

तिसरा वनडे सामना, 21 डिसेंबर 2023, पार्ल

कसोटी मालिका

पहिली कसोटी, 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2023, सेंच्युरियन

दुसरी कसोटी, 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2024, केप टाऊन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.