दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआय निवड समितीने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. यात युवा खेळाडूंसह अनुभवी खेळाडूंनाही संधी दिल्याचे दिसते. टीम इंडिया (Team India) पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणा आहे. यासाठी निवडलेल्या संघात शिखर धवनला (Shikhar Dhawan) संघात स्थान मिळाले असले तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळेल का? हा मोठा प्रश्नच आहे.
अनुभवापेक्षा युवा जोश ठरलाय भारी
अनुभवी शिखर धवनसह ऋतूराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) ही दोघ संघात आहेत, देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे स्पर्धेत अय्यर आणि गायकवाड दोघांनी धुमाकूळ केलाय. त्यामुळे अनुभवी धवनला (Shikhar Dhawan) संघात जागा मिळाली असली तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळणं कठिण आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत धवनला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता. त्याने ऑलओव्हर 57 अर्धशतके झळकावली असली तरी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी त्याला बाकावर बसावे लागू शकते.
24 वर्षीय ऋतूराज गायकवाडने विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक 603 धावा केल्या आहेत. त्याने 5 डावातील चार डावत शतक झळकावले होते. यात त्याची सरासरी 151 तर स्ट्राइक रेट 113 चे होते. एवढेच नाही आयपीएलच्या गत हंगामातही त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. ओवरऑल लिस्ट कारकिर्दीत त्याने 63 डावात 55 च्या सरासरीने 3284 धावा केल्या आहेत. यात 11 शतकांसह 16 अर्धशतकाचा समावेश आहे. नाबाद 187 ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलसोबत तो भारतीय संघाच्या डावाला सुरुवात करु शकतो.
अय्यरची अष्टपैलू कामगिरी लक्षवेधीच
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत व्यंकटेश अय्यरने गोलंदाजी आणि फलंदाजीनं विशेष छाप सोडलीये. 27 वर्षीय खेळाडूने 6 डावात 63 च्या सरासरीने 379 धावा केल्या आहेत. यात 2 शकतकांसह एका अर्धशतकाचा समावेश आहे. 151 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. गोलंदाजीत त्याने 9 विकेट घेतल्या आहेत. ओवरऑल लिस्ट ए कारिकिर्दीत त्याने 28 डावात 51 च्या सरासरीने 1228 धावा केल्या आहेत. यात 4 शतक 4 अर्धशतकाचा समावेश आहे. याशिवाय 19 विकेटही त्याच्या नावे आहेत.
शिखर धवन या दोघांच्या तुलनेत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत फेल ठरला. 5 डावात त्याने केवळ 56 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ही 18 आहे. त्यामुळे राहुल द्रविड नेमक कोणाला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अनुभवाच्या धवनला एखादी संधी मिळूही शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.