IND vs ENG U19 WC Final : अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व सामने जिंकून भारतीय संघाने फायनल गाठली आहे. चार वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या टीम इंडियाचा सामना इंग्लंड विरुद्ध होणार आहे. इंग्लंडने 1998 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. ही आकडेवारी भारतीय संघाची दावेदारी आणखी भक्कम करणारी आहे. शनिवारी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ आणखी एकदा वर्ल्ड कप स्पर्धा गाजवणार की इंग्लंड भारतीय संघाला आश्चर्याचा धक्का देणार हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होईल. जाणून घेऊयात सामना कधी कुठे आणि कसा पाहता येईल यासंदर्भातील माहिती. (India U19 vs England U19 World Cup 2022 Final Live Streaming Telecast Channel When Where And How To Watch)
भारतीय संघाची कामगिरी
साखळी फेरीत भारतीय संघाने (India U19) सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत केले होते. आयर्लंड विरुद्धचा दुसरा सामना भारतीय संघाने 174 धावांनी जिंकला. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने युंगाडाचा 326 धावांनी धुव्वा उडवला होता. क्वार्टर फायनलमध्ये गत विजेत्या बांगलादेशला नमवून टीम इंडियाने सेमी फायनल गाठली आणि सेमी फायनलमध्ये कांगारुंची शिकार केली.
इंग्लंडही अपराजित
दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या (England U19) संघानेही स्पर्धेत दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. त्यांनीही एकही सामना गमावलेला नाही. सर्वच्या सर्व पाच सामन्यातील विजयासह संघाने अंतिम फेरी गाठली. क्वार्टर फायनलमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेला तर सेमी फायनलमध्ये त्यांनी अफगाणिस्तानला पराभूत केले आहे.
भारतीय संघाने चार वेळा जिंकलीये स्पर्धा
भारतीय संघाने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये वर्ल्ड कप जिंकला आहे. याशिवाय 2006, 2016 आणि 2020 मध्ये भारतीय संघाने फायनल खेळली होती. भारतीय संघ विक्रमी आठव्यांदा फायनलमध्ये पोहचला आहे.
इंग्लंडने 1998 मध्ये जिंकले आहे एकमेव जेतेपद
इंग्लंडच्या संघाने 1998 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. 24 वर्षांनी ते पहिल्यांदा फायनलपर्यत पोहचले आहेत. त्यामुळे फायनलमध्ये त्यांच्यावर भारतापेक्षा अधिक दबाव निश्चितच असेल.
कधी रंगणार भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल ही शनिवारी 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
कुठे खेळवला जाणार सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना अँटिगा सर विवियन रिचर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे.
किती वाजता सुरु होईल सामना?
भारतीय प्रमाणवेळेनुसार या सामन्याची नाणेफेक ही सायंकाळी 6 वाजता होईल. सामन्यातील पहिला चेंडू साडेसहा वाजता फेकला जाईल.
कोणत्या चॅनेलवर पाहता येईल सामना?
आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2022 चे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर दाखवण्यात येत आहेत. याच चॅनेलवर तुम्ही सामन्याचा आनंद घेऊ शकता.
ऑनलाईन स्ट्रीमिंग?
अंडर-19 वर्ल्ड 2022 स्पर्धेतील सामन्यांचे लाइव्ह-स्ट्रीमिंग डिज्नी-हॉटस्टारवर पाहता येईल. याशिवाय सामन्यासंदर्भातील बातम्या, लाईव्ह ब्लॉग आणि रेकॉर्डससाठी तुम्ही https://www.esakal.com/krida या लिंकवर क्लिक करुन अपडेट्स मिळवू शकता.
भारतीय टीम: यश धूल (कर्णधार), हरनूर सिंग, अंग्रीष रघुवंशी, एसके राशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्या यादव, राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आरएस हंगरगेकर, वासु वत्स, विक्की ओस्तवाल, रवि कुमार, गर्व सांगवान.
राखीव खेळाडू: ऋषित रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय.
इंग्लंडचा संघ : रेहान अहमद, टॉम एस्पिनवाल, सन्नी बेकर, नाथन बार्नवेल, जॉर्ज बेल, जॅकब बेथेल (उप कर्णधार), जोश, बॉयडेन, जेम्स कोल्स, एलेक्स हॉर्टन, विल लक्सटन, टॉम पर्स्ट (कर्णधार), जेम्स रेव, जेम्स सेल्स, फतेह सिंह, जॉर्ज थॉमस.
राखीव खेळाडू: जोश बेकर, बेन क्लिफ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.