भारताच्या 19 वर्षाखालील संघाने (India U19 World Cup 2022 Winner Team) 5 व्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरत ऐतिहासिक कामगिरीचं अजून एक पान सुवर्ण अक्षरांनी लिहिलं. बीसीसीआयने (BCCI) देखील त्यांच्यावर आर्थिक बक्षिसांचा वर्षाव केला. प्रत्येकाला 40 लाख रूपये देण्याचं जाहीर केलं. येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Mega Auction 2022) देखील होणार आहे. त्या देखील या संघातील अनेक खेळाडू कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली यात शंका नाही. मात्र हा पैसा ही फेम वर्ल्डकप जिंकल्यानंतर आली आहे. त्यापूर्वी ही पोरं सामन्य घारातील पोरांसारखीच होती. जीवनातील संघर्ष हा त्यांच्या पाचवीलाच पुजला होता. कोरोनानं कोणच्या डोक्यावरून बापाचं छत्र हिरावून घेतलं होतं तर कोणाचा चिमुकला भाऊ ब्लड कॅन्सरच्या वेदना सहन करत होता. तर कोणाच्या बापाला पोराच्या क्रिकेटच्या वेडापायी आपली नोकरी गमवावी लागली होती. (India U19 World Cup 2022 Winner Team Players Struggle story Rajvardhan Hangargekar lost his Father due To Corona)
मानसिक, शारीरिक संघर्षाच्या अनेक कहाण्या या विश्वविजेच्या 19 वर्षाखालील संघात लपल्या आहेत. वेस्ट इंडीजमध्ये 19 वर्षाखालील वर्ल्डकप (U19 World Cup) सुरू असतानाच भारताचा निम्मा संघ तसेच काही सपोर्ट स्टाफ देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची बातमी आली. या बातमीनंतर भारताचं (India U19) वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात येतयं की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. संघातील सर्व प्रमुख खेळाडू विलगीकरणात होते. कोवळ्या वयातील या पोरांच मनोबल वाढवायला सपोर्ट स्टाफही पुरेसा नव्हता. मात्र या पोरांनी ना सपोर्ट स्टाफमधील इतर सहकाऱ्यांनी हार मानली नाही. फिजिओ डॉक्टर बनला तर व्हिडिओ एनलिस्ट मॅनेजर बनला. तरी फक्त 10 खेळाडूच सामने खेळण्यासाठी फिट होते. अखेर 11 व्या खेळाडूने दुखापत बाजूला सारून खेळण्याचा निर्णय घेतला. सहयोगी प्रशिक्षकानं मैदानात जाऊन पाणी दिलं.
भारतीय फलंदाजीची मदार असलेले कर्णधार यश धुल (Yash Dhull) आणि एस. राशीद (Shaik Rasheed) दोघेही कोरोनाग्रस्त झाले होते. राशीद तर आपल्या प्रशिक्षकासमोर ढसाढसा रडला होता. त्याला वाटलं की आता तो प्ले ऑफ सामन्याला देखील मुकणार. मात्र प्रशिक्षक जे कृष्ण राव यांनी त्याला तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी किती कष्ट घेतले? त्यांनी तुझ्यासाठी नोकरीची देखील परवा केली नाही याची आठवण करून दिली. त्या राशीदनं सेमी फायनलमध्ये 94 तर फायनलमध्ये अर्धशतकी खेळी केली.
विकी ओत्सवाल (Vicky Ostwal) हा वर्ल्डकपमधील सर्व सामने खेळलेल्या खेळाडूंपैकी एक! तो संघातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने वर्ल्डकपमध्ये 12 विकेट घेतल्या आहेत. पण, या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजानं इथंपर्यंत पोहचण्यासाठी बरेच कष्ट उपसले आहेत. तो 9 वर्षाचा असल्यापासून आपल्या वडिलांबरोबर रोज लोणावळा ते मुंबई प्रवास करत होता. कारण होतं क्रिकेट! या विकी ओत्सावलचे प्रशिक्षक मोहन जाधव सांगतात की, 'विकी ओत्सवाल हा सरावाला कधी खूप उशिरा यायचा किंवा कधी फार लवकर यायचा. मी त्यांना विचारलं की तुम्ही कोठून येता. त्यावेळी त्यांनी सांगितलं की ते लोणावळ्यावरून येतात. त्यावेळी मी म्हटलं की हा मजबतू पोरगा आहे.'
जाधव यांच्याकडे येणारा अजून एक मुलगा U19 च्या वर्ल्डकप विजेत्या संघात आहे. तो म्हणजे वेगवान गोलंदाज आणि षटकारांची क्रेज असलेला राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar). मात्र त्यानेही संघर्षातूनच हे यशाचे शिखर गाठले आहे. 2020 मध्ये कोरोनाच्या लाटेत त्याच्या डोक्यावरचे बापाचे छत्र हरवले. प्रशिक्षक जाधव म्हणतात की, कोरोनामुळे बापाचे छत्र हरवलेल्या एका पोराला तुम्ही काय सांगणार? त्याच्या डोक्यात संध्या एकच गोष्ट असते वेगवान गोलंदाजी करणे आणि मोठेमोठे षटकार मारणे! (Rajvardhan Hangargekar lost his Father due To Corona)
19 वर्षाखालील भारतीय संघातील सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) हा संघातील सर्वात लहान खेळाडू आहे. त्याने क्रिकेट खेळण्यासठी 11 व्या वर्षी गुरूग्राम सोडलं होते. त्याचा भाऊ क्रिशंग हा देखील टेनिस खेळतो. मात्र तो लहान असताना त्याला ब्लड कॅन्सर झाला होता. याबाबत अंगक्रिशची आई सांगते की, अंगक्रिश आमच्या बरोबरच रूग्णालयात झोपायचा. ती पाच वर्ष खूप तापदायक होती. अंगक्रिश त्याच्या लहान भावाला क्रिशंगला कधी एकटा सोडत नव्हता. आम्ही अंगक्रिशला जे पाहिजे ते दिलं. मात्र क्रिशंगच्या आजारपणानं त्याला मानसिकदृष्टा संक्षम केलं.' अंगक्रिशची आई सध्या क्रिशंगच्या ज्युनियर टेनिस स्पर्धेसाठी स्पेनमध्ये आहे.
संघातील विकेटकिपर बनाची कहानी जरा वेगळीच आहे. त्याने एमएस धोनीप्रमाणे षटकार मारत वर्ल्डकप जिंकून दिल्याने तो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता. मात्र बना हा विकेटकिपर बॅट्समन म्हणून पहिली पसंती नव्हता. चॅलेंजर ट्रॉफीच्या इंडिया बी आणि इंडिया एफ यांच्यातील सामन्यादरम्यान बनाचा मित्र सिंधूने त्याला सांगितले की U19 संघाची निवडसमिती हा सामना पाहण्यासाठी येणार आहे. त्यावेळी बनाने त्याला 'तू फक्त आज माझे षटकार मोजायचेस!' असे सांगितले. त्या सामन्याता बनाने 68 चेंडूत 170 धावा ठोकल्या. त्यात 10 चौकार आणि तब्बल 14 षटकारांचा समावेश होता. अशही U19 ची वर्ल्डकप विजेती टीम आणि त्याच्या संघर्षाची कहाणी!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.