India vs Australia 1st T20I : ऑस्ट्रेलियाने भारताचे 209 धावांचे आव्हान 19.2 षटकातच पार करत तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने सामना 4 विकेट्स राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने आक्रमक 61 धावा केल्या तर पडझडीनंतर मॅथ्यू वेडने डाव सावरत 21 चेंडूत 45 धावांची आक्रमक खेळी केली. भारताकडून अक्षर पटेलने 3 तर उमेश यादवने 2 विकेट घेत चांगली झुंज दिली.
ऑस्ट्रेलियाच्या 12 ते 17 षटकात पाठोपाठ विकेट्स पडल्याने ते बॅकफूटला गेले होते. मात्र स्लॉग ओव्हरमध्ये मॅथ्यू वेड आणि टीम डेव्हिडने आक्रमक फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले.
अक्षर पटेलने 10 चेंडूत 17 धावा करणाऱ्या जॉश इग्निसचा त्रिफळा उडवत कांगारूंना पाचवा धक्का दिला.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्मार्ट रिव्ह्यू घेतला त्यामुळे स्टीव्ह स्मिथची 35 धावांची खेळी समाप्त झाली. त्यानंतर याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर देखील रोहितने ग्लेन मॅक्सवेलसाठी रिव्ह्यू घेतला. तोही परफेक्ट राहिला. त्यामुळे उमेश यादवला एकाच षटकात स्मिथ आणि मॅक्सवेल दोन्ही विकेट मिळाल्या.
कॅमेरून ग्रीनचा झेल सोडणाऱ्या अक्षर पटेलनेच त्याला बाद केले. मात्र तोपर्यंत ग्रीनने 30 चेंडूत 61 धावा चोपल्या होत्या.
भारताने ठेवलेल्या 209 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरूवात केली. कॅमेरून ग्रीनला सलामीला पाठवत कांगारूंनी आपले इरादे आधीच स्पष्ट केले. त्याने उमेश यादवच्या दुसऱ्याच षटकात सलग 4 चौकार मारत धडाक्यात सुरूवात केली. त्याने जीवनदानाचा फायदा उचलत 24 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 10 व्या षटकातच शतक पार केले.
ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी अॅरोन फिंच आणि कॅमेरून ग्रीन यांनी 3 षटकात 38 धावा चोपून चांगली सुरूवात केली होती. मात्र अखेरीस अक्षर पटेलने फिंचचा 22 धावांवर त्रिफळा उडवत भारताला दिलासा दिला.
हार्दिक पांड्याने 25 चेंडूत नाबाद अर्धशतक ठोकत भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले. त्याने शेवटच्या षटकात कॅमेरून ग्रीनला सलग तीन षटकार मारत भारताला 208 पर्यंत पोहचवले.
एलिसने दिनेश कार्तिकला 6 धावांवर बाद करत भारताला सहावा धक्का दिला. एलिसची ही तिसरी विकेट होती.
दिनेश कार्तिकच्या आधी फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या अक्षर पटेलने निराशा केली. तो 5 चेंडूत 6 धावा करत एलिसची शिकार झाला.
सूर्यकुमार यादवने राहुल बाद झाल्यानंतर आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. मात्र त्याने 25 चेंडूत 46 धावा चोपल्या असताना कॅमेरून ग्रीनने त्याला बाद केले.
जॉस हेजलवूडने भारताचा दुसरा सलामीवीर देखील गळाला लावला. त्याने केएल राहुलला 55 धावांवर बाद करत तिसऱ्या विकेटसाठी रचलेली 68 धावांची भागीदारी तोडली.
केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी सुरूवातीच्या पडझडीनंतर तिसऱ्या विकेटसाठी 31 चेंडूत नाबाद 51 धावांची अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 10 षटकात 86 धावांपर्यंत पोहचवले. राहुल 47 धावांवर नाबाद आहे तर सूर्याने 16 चेंडूत 23 धावा केल्या आहेत.
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी गेल्यानंतर सलामीवीर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरत सातव्या षटकात भारताचे अर्धशतक धावफलकावर लागवले.
विराट कोहली 7 चेंडूत 2 धावा करून माघारी परतला. त्याला नॅथन एलिसने बाद केले.
जॉश हेजलवूडने भारताला पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार रोहित शर्माला 11 धावांवर बाद केले.
टी 20 वर्ल्डकप संघात पुनरागमन केलेला जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात खेळणार नाही. बुमराह नुकताच दुखापतीतून सावरला आहे. रोहितने तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यात खेळेल असे सांगितले.
याचबरोबर भारताने पहिल्या सामन्यासाठी विकेटकिपर म्हणून दिनेश कार्तिकला पसंती दिली आहे. डावखुरा फलंदाज म्हणून अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला संधी देऊन संघात उत्तम समतोल साधण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिंगापूरचा टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियाकडून टी 20 पदार्पण करणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात मोहालीत सुरूवात होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.