IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपुर मधला सामना कुठे 'फ्री' पाहायचा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.
india vs australia 2nd t20
india vs australia 2nd t20sakal
Updated on

India vs Australia 2nd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडिया शुक्रवारी मालिकेत बरोबरी साधण्यासाठी या मैदानावर उतरणार आहे. पहिल्या सामन्यात चार विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघाने हा सामना जिंकला नाही तर मालिका गमवावी लागेल.

नागपुरातील भारताचा विक्रम पाहता गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी येथे एकही टी-20 सामना हारला नाही. टीम इंडिया पाचव्यांदा टी-20 सामना खेळण्यासाठी नागपुरात उतरणार आहे. नागपुरात आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमध्ये भारतीय संघाने दोन जिंकले आहेत. त्याचवेळी त्यांना दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. ती येथे प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

india vs australia 2nd t20
Babar-Virat : बाबर आझमने पुन्हा विराट कोहलीला टाकले मागे, रिझवानसोबत रचला इतिहास

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 23 सप्टेंबरला नागपुर मधील स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळल्या जाणार आहे.

सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?

आशिया कपच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी वर पाहू शकता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 'फ्री' कुठे पाहायचा

हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.

india vs australia 2nd t20
IND vs AUS : रोहितने मैदानातच का धरला कार्तिकचा गळा; सूर्यकुमार यादवने केला खुलासा
  • भारतीय संघ : भारत-रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वरकुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमरा, उमेश यादव.

  • ऑस्ट्रेलिया : सीन अॅबॉट, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हीड, नॅथन इलिस, अॅरोन फिंच (कर्णधार), कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झाम्पा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.