India Vs Australia T20 Series: कर्णधारपदाच्या आपल्या पहिल्याच सामन्यात निर्णायक योगदान देऊन भारताला विजय मिळवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या या खेळीचे वर्णन बेधकडक असे केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना भारताने दोन विकेटने जिंकून पाच लढतींच्या मालिकेची विजयी सुरुवात केली.
सूर्यकुमारने ४२ चेंडूत ८० धावांची झंझावाती खेळी करताना ईशान किशनसह ११२ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचे ३ बाद २०८ धावांचे आव्हान एक चेंडू राखून पार केले.
याच सूर्यकुमारला रविवारी झालेल्या विश्वकरंडक अंतिम सामन्यात याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ १८ धावाच करता आल्या होत्या. पण ट्वेन्टी-२० या आपल्या हुकमी प्रकारात आल्यावर सूर्यकुमार तळपला. हार्दिक पंड्या तंदुरुस्त नसल्यामुळे सूर्यकुमारची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्याने आपल्याच जबाबदारीत विजय मिळवला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या जॉश इंग्लिसने ५० चेंडूत ११० धावांची खेळी केली, परंतू सूर्यकुमारच्या ८० धावांपुढे ती फिकी पडली. या खेळीचे वर्णन करायला सांगितल्यावर सूर्यकुमारने बेधडक असा शब्दप्रयोग केला.(Latest Marathi News)
एकीकडे सूर्यकुमार धडाकेबाज खेळी साकार करत असताना दुसऱ्या बाजूला त्याचा मुंबई इंडियन्समधील सहकारी ईशान किशनने ३९ चेंडूत ५८ धावा केल्या. ईशानच्या भागीदारीचा मोठा फायदा झाला. तो दुसऱ्या बाजूला असल्यामुळे मी बिनधास्त फलंदाजी करु शकलो, असे सूर्यकुमारने सांगितले. या खेळीत सूर्यकुमारचा स्ट्राईक रेट १९०.४७ इतका होता.ईशान किशननंतर सूर्यकुमार बाद झाल्यावर रिंकून सिंगने १४ चेंडूत दिलेले नाबाद २२ धावांचे योगदान तेवढेच मोलाचे ठरले.
रिंकूबाबत बोलताना सूर्यकुमार म्हणाला, परिस्थिती दडपणाची असली तरी रिंकू सिंग शांत आणि निश्चिल होता. मुळात तो कोणतेही दडपण न घेता मैदानात उतरला होता. फलंदाजीतही त्याने हाच संयम दाखवला, त्याची ही खेळी फारच चांगली होती.(Latest Marathi News)
द्विशतकी आव्हान असल्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये दडपणाची स्थिती होती का, या प्रश्नावर बोलताना सूर्यकुमार म्हणाला, थोडेसे दडपण होते. संघातील बहुतांशी खेळाडू तसे नवे आहेत, पण आव्हान कितीही असले तरी ते स्वीकारायचे हेच आमचे धोरण होते. आपण जर हे आव्हान पार केले तर ते फारच आनंददायी असेल, आम्ही एकमेकांना सांगत होतो.
‘ट्वेन्टी-२०’ सामन्यात सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेते
१५ : विराट कोहली (११५ सामने)
१४ : मोहम्मद नबी (१०९ सामने
१३ : सूर्यकुमार यादव (५४ सामने)
१२ : रोहित शर्मा (१४८ सामने) (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.