India vs Australia : 3000 पोलीस अन् 15 दंगल विरोधी पथकं! भारत - ऑस्ट्रेलिया पहिला सामना होणार कडक बंदोबस्तात

India vs Australia
India vs Australiaesakal
Updated on

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना हा पंजाबमधील मोहाली येथे खेळवण्यात येणार आहे. वर्ल्डकपपूर्वी दोन्ही संघासाठी हा सामना सरावाची एक उत्तम संधी असणार आहे. मात्र या सामन्याला सध्या सुरू असलेला खलिस्तान, कॅनडा वादाची किनार देखील लाभली आहे. त्यामुळे या सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था असणार यात काही शंका नाही.

India vs Australia
IND vs AUS India Playing 11 : तब्बल 21 महिन्यांनी अश्विन वनडे संघात परतणार; ऑस्ट्रेलियाविरूद्ध अशी असणार प्लेईंग 11

पंजाब पोलीस कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त डीजीपी अर्पित शुक्ला यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था कशी असेल याची माहिती दिली.

ते एएनआयशी बोलताना म्हणाले की, 'आम्ही या सामन्यासाठी चार स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. आयजी रोपर हे या सुरक्षेचे इनचार्ज असतील. जवळपास 3000 पोलीस कर्मचारी आणि 15 दंगल विरोधी पथकं तैनात करण्यात आली आहेत.'

'सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांसाठी अनेक पार्किंग स्लॉट तयार करण्यात आले आहेत. मोहालीवासियांसाठी वाहतुकीसंदर्भातील मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

India vs Australia
IND vs AUS India Playing 11 : तब्बल 21 महिन्यांनी अश्विन वनडे संघात परतणार; ऑस्ट्रेलियाविरूद्ध अशी असणार प्लेईंग 11

भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबरला मोहाली येथे खेळवला जाणार आहे. दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर 24 सप्टेंबरला तर तिसरा सामना हा राजकोटवर 27 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.

भारताने रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. हे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खेळणार आहेत. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()