Ind vs Aus Final Weather : भारत-ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये कसे असेल हवामान? पाऊस पडला तर काय... समजून घ्या गणित

Ind vs Aus Final Weather : भारत-ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये कसे असेल हवामान? पाऊस पडला तर काय... समजून घ्या गणित
Updated on

India vs Australia World Cup 2023 Final Ahmedabad Weather Report : उद्या क्रिकेट जगतातील सर्वात मोठा सामना अहमदाबाद येथे रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्डकप फायनलपूर्वी अहमदाबादमधील हवामानाची बरीच चर्चा आहे. त्यामुळे अंतिम सामन्याच्या दिवशी अहमदाबादमध्ये हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.

फायनल मॅचमध्ये पाऊस पडला तर काय परिणाम होईल? यासोबतच राखीव दिवसाचे समीकरण काय असेल आणि कोणत्या संघाला जास्त फायदा होईल... हे देखील जाणून घेऊया.

Ind vs Aus Final Weather : भारत-ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये कसे असेल हवामान? पाऊस पडला तर काय... समजून घ्या गणित
Mohmmad Shami: मोहम्मद शमीच्या गावात उभारलं जाणार स्टेडियम; अमरोहाच्या जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

फायनलमध्ये कसे असेल हवामान

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, अहमदाबादचे हवामान 19 नोव्हेंबरला स्वच्छ असणार आहे. कमाल तापमान 33 अंशांच्या आसपास असेल. किमान तापमान 20 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

सध्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. म्हणजे अंतिम सामना रंगतदार होईल आणि पूर्ण 100 षटकांचा सामना पाहता येईल. मात्र सायंकाळनंतर मैदानावर दव नक्कीच दिसेल. या काळात ताशी 8 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Ind vs Aus Final Weather : भारत-ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये कसे असेल हवामान? पाऊस पडला तर काय... समजून घ्या गणित
India Vs Australia : मुंबईतील क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! तीन क्रिकेट स्पेशल ट्रेनची घोषणा

पाऊस पडला तर काय होईल समीकरण?

अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडणार नाही हे स्पष्ट आहे, मात्र हा अंदाज चुकला आणि पाऊस पडला तर चाहत्यांची निराशा होईल. अशा परिस्थितीत जास्त पाऊस पडल्यास षटके कमी होतील आणि डकवर्थ लुईस नियम लागू होईल. याशिवाय अंतिम सामन्यात दिवसभर पाऊस पडला तर त्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. 19 नोव्हेंबरला पावसामुळे सामना थांबला तर तेथून दुसऱ्या दिवशी पूर्ण होईल.

राखीव दिवशीही पाऊस पडला तर आयसीसीच्या नियमानुसार, गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणारा संघ विजेता मानला जाईल. सध्या हवामानाचा अंदाज पाहता त्याची शक्यता कमी किंवा नगण्य आहे.

सध्या सर्वांच्या नजरा भारतीय संघाकडे लागल्या आहेत. टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहताना सलग 10 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आहे. भारतीय चाहत्यांना टीम इंडियाकडून पूर्ण अपेक्षा आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियानेही चमकदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.