IND vs AUS : अहमदाबाद कसोटी अनिर्णित! भारत आणि ऑस्ट्रेलिया रंगणार WTC फायनलचा थरार

अहमदाबाद कसोटी अनिर्णित, अश्विन-जडेजा मालिकेत सर्वोत्तम
india vs australia wtc final 2023 cricket sport date venue match schedule and all you need to know
india vs australia wtc final 2023 cricket sport date venue match schedule and all you need to knowsakal
Updated on

अहमदाबाद : फलंदाजांचे राज्य अहमदाबाद कसोटीत पाचही दिवस कायम राहिल्याने सामना एकदम निरस झाला आणि अपेक्षेप्रमाणे अनिर्णीत राहिला. पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चांगल्या वातावरणाचा फायदा घेत २ बाद १७५ धावांपर्यंत मजल मारल्यावर स्टीव्ह स्मिथ आणि रोहित शर्माने हस्तांदोलन करून सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.

सामन्याचा मानकरी विराट कोहली ठरला; तर आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना विभागून मालिकेचे सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. मालिका भारतीय संघाने २-१ फरकाने जिंकली. हेच दोन संघ ७ जून रोजी लंडनमधील ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात एकमेकांना भिडणार आहेत.

india vs australia wtc final 2023 cricket sport date venue match schedule and all you need to know
IND vs AUS: टीम इंडियाने घातली बॉर्डर गावसकर ट्रॉफीला गवसणी! ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा टेकले गुडघे

सकाळच्या सत्रात काही जादू घडते का इतकीच माफक वेडी आशा उरात घेऊन भारतीय संघ मैदानात उतरला. अश्विनने नाइट वॉचमन कुनेमनला पायचित केले. गोलंदाज प्रयत्न करू लागले, पण खेळपट्टी कोणतीच साथ देत नव्हती. ट्रॅव्हीस हेड आणि लबुशेनने त्याचाच फायदा घेत फलंदाजीचा सराव करून घेतला.

दोघांपैकी हेडने जरा तरी फटके मारण्यासाठी प्रयत्न केले. लबुशेनला मालिकेत आलेले अपयश शेवटच्या डावात पुसायचे होते. १० चौकार आणि दोन षटकारांसह ट्रॅव्हीस हेडने ९० धावांची खेळी केली. अक्षर पटेलचा अचानक वळालेल्या चेंडूवर हेड बोल्ड झाला. त्यानंतर लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथने संथ खेळ करून भारताला अजून यश मिळू दिले नाही.

रोहित शर्माने संघातील फलंदाजांना मग गोलंदाजीची संधी दिली. शुबमन गिल, चेतेश्वर पुजाराने हात फिरवून घेतला. दुपारी साडेतीन वाजता २ बाद १७५ धावसंख्येवर स्मिथ आणि रोहितने खेळ थांबवण्याचा पर्याय मान्य केला. लबुशेन ६३ आणि स्मिथ १० धावांवर नाबाद राहिले.

संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया, पहिला डाव ः ४८०. भारत, पहिला डाव ः ५७१, ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ः २ बाद १७५ (ट्रॅव्हीस हेड ९०, मार्नस लबुशेन नाबाद ६३, आर अश्विन २४-९-५८-१)

मालिकेचा निकाल

  • भारत २ ः ऑस्ट्रेलिया १

india vs australia wtc final 2023 cricket sport date venue match schedule and all you need to know
IND vs AUS: पुजारा अन् शुभमनच्या गोलंदाजीला कर्णधार स्मिथ घाबरला! डाव सोडला अर्ध्यावर?

गेल्या ४ बॉर्डर-गावसकर मालिकेचे निकाल

(चारही वेळा भारत २-१ नेच विजयी)

  • २०१६/१७ (भारत) ः भारत विजयी २-१

  • २०१८/१९ (ऑस्ट्रेलिया) ः भारत विजयी २-१

  • २०२०/२१ (ऑस्ट्रेलिया) ः भारत विजयी २-१

  • २०२२/२३ (भारत) ः भारत वि. २-१

बॉर्डर-गावसकर करंडक एकाच संघाने चार वेळा जिंकण्याचा पहिलाच प्रसंग

ज्या ३० कसोटी मालिकांमध्ये स्टीव स्मिथ खेळला, त्यातील दुसऱ्यांदा तो मालिकेत एकही अर्धशतक करू शकला नाही. याअगोदर पाकविरुद्ध मायदेशात २०१९-२० मध्ये दोन कसोटीत त्याला अर्धशतक करता आले नव्हते.

  • २०१८ नंतर भारतात झालेल्या कसोटी सामन्यांपैकी दुसरा सामना अनिर्णित राहिला. याअगोदर कानपूर येथील न्यूझीलंडविरुद्धचा सामना निकाली ठरला नव्हता.

  • २०११ नंतर भारतातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू

  • २०१३ ः आर. अश्विन (२९ विकेट २० धावा)

  • २०१७ : रवींद्र जडेजा (२५ विकेट १२७ धावा)

  • २०२३ : आर. अश्विन (२५ विकेट ८६ धावा)- रवींद्र जडेजा (२२ विकेट, १३५ धावा)

अहमदाबाद कसोटीत पाच दिवसांत केवळ २१ फलंदाज बाद. २००९ नंतर भारतात असे दुसऱ्यांदा घडले. श्रीलंकेविरुद्ध २००९ च्या कसोटीत इतके कमी फलंदाज बाद (त्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता)

india vs australia wtc final 2023 cricket sport date venue match schedule and all you need to know
Suryakumar Yadav : मुंबईच्या रस्त्यावर सूर्याची बॅट तळपली! गल्लीतला 360चा व्हिडिओ व्हायरल

सूर्यकुमारची करमणूक

अहमदाबाद कसोटीतील मजा निघून गेल्याने खेळाडूंचे लक्ष न्यूझीलंड वि. श्रीलंका सामन्याकडे लागले होते. न्यूझीलंडने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला, ज्याचा आनंद भारतीय खेळाडूंनाही झाला, कारण त्या विजयाने भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यामधला प्रवेश नक्की झाला. मैदानावरचा खेळ अत्यंत रटाळ चालू असल्याने बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने म्हणे न्यूझीलंड वि. श्रीलंका सामन्याचे धावते वर्णन करून खेळाडूंची चांगलीच करमणूक केली.

अशा पण खेळपट्ट्या नको

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर कोण फलंदाज आणि कोणते गोलंदाज चमकले याची चर्चा कमी आणि खेळपट्टीची चर्चाच जास्त झाली. पहिल्या तीन कसोटी सामन्यासाठीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांचे गरजेपेक्षा जास्त लाड करत होती. शेवटच्या सामन्याच्या खेळपट्टीने गोलंदाजांवर राग काढला इतकी ती फलंदाजीला पोषक होती. कसोटी क्रिकेट जिवंत ठेवायचे असेल तर तीन दिवसांत सामना संपणाऱ्या खेळपट्ट्या नकोत तसेच गोलंदाजांना काहीच संधी नसलेली अहमदाबादसारखी पण खेळपट्टी नको, असाच सूर माजी खेळाडू आळवत होते.

आव्हानात्मक मालिका :

रोहित शर्मा

सामन्यानंतर बोलताना रोहित म्हणाला, चांगल्या वातावरणात खेळली गेलेली कठीण मालिका असे मी पहिले वर्णन करेन. पहिल्या सामन्यापासून मालिकेत रंगत चढली. आम्हा फलंदाजांच्या कौशल्याची परीक्षा बघितली गेली. आपल्या गोलंदाजांनी शिस्तपूर्ण मारा करून यश खेचून आणले. दिल्ली कसोटीत आम्ही मागे पडलो होतो.

india vs australia wtc final 2023 cricket sport date venue match schedule and all you need to know
IND vs AUS : गिल अन् पुजारा आले! मी आता जॉब सोडू का? आर अश्विनचे ते ट्वीट चर्चेत

त्या सामन्यात आमच्या अष्टपैलू खेळाडूंनी योग्य काम करून संघाला सामन्यात परत आणले. जर नजर टाकली, तर सगळ्याच खेळाडूंनी कधी ना कधी उत्तम कामगिरी करून संघाला आव्हानात्मक परिस्थितीतून बाहेर काढले. सगळ्यांचा हातभार लागून २-१ विजय मिळवता आला याचा आनंद मोठा आहे, सुनील गावसकर यांच्या हस्ते स्वीकारताना रोहित शर्मा म्हणाला.

एकमेका साह्य करू...

एकमेकांच्या असण्यानेच परिणाम साधला गेला. फिरकी गोलंदाजी तेव्हाच चांगले काम करते जेव्हा दोनही बाजूंनी टिच्चून मारा होतो. आम्ही तोच प्रयत्न करतो. खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असते तेव्हा टप्पा दिशा पकडून मारा करणे उगाच काही तरी वेगळे करायला न जाणे महत्त्वाचे ठरते. चांगल्या गोलंदाजीचा परिणाम फलंदाजीत होतो आहे. आम्हाला, अश्विन जडेजा एकत्र मालिकेच्या मानकऱ्याचे बक्षीस एकत्र घेताना म्हणाले.

वेगवान मालिकेचा संथ शेवट ः स्मिथ

वेगाने चालू झालेली मालिका एकदम संथ होऊन संपली. मी म्हणेन की चार कसोटी सामन्यांत जोरदार क्रिकेट लढाई आमच्यात झाली. दोन्ही संघांनी आपापल्या सामुग्रीसह क्रिकेटचा हल्ला चढवला. दोन कसोटी सामने हरल्यावर इंदूर कसोटीत पुनरागमन करणे आमच्यासाठी मनोबल वाढवणारे ठरले आहे. तसेच नॅथन लायनला दोन तरुण फिरकी गोलंदाज टॉड मर्फी आणि कुनेमनने दिलेली साथ जबरदस्त होती. शेवटचा सामना अजून रंगतदार झाला असता तर मजा आली असती, स्मिथ हसत हसत म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.